-
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या खेळाएवढाच मैदानाबाहेरील वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत असतो.
-
पत्नी नताशा स्टॅन्कोविकशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या तरूणींची नेहमीच चर्चा होत असते. नुकतेच गर्लफ्रेंड जास्मिन वालियाबरोबर त्याचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते.
-
आता मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्माबरोबर हार्दिक पांड्या डेट करत असल्याची चर्चा आहे.
-
नताशापासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याचे नाव युकेमधील गायिका जॅस्मिन वालियाशी जोडले गेले होते. मात्र दोघांनी आपल्या नात्याची कधीही जाहीर वाच्यता केली नाही. मात्र दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले होते.
-
मॉडेल माहिका शर्माच्या एका सेल्फीमध्ये क्रिकेट हार्दिक पांड्या दिसत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. तसा एक फोटोही सध्या व्हायरल होत आहे.
-
माहिका शर्माच्या मिरर सेल्फीमध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्या दिसत असल्याच्या अफवा आहेत. याशिवाय हे दोघे एकमेकांना इन्स्टाग्रामवरही फॉलो करतात.
-
माहिका शर्माच्या बोटांचाही एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पेनाने ३३ हा क्रमांक लिहिला गेला आहे. हार्दिक पांड्याच्या जर्सीचा क्रमांक हाच असल्यामुळे चर्चांना पेव फुटले आहे.
-
एवढेच नाही तर हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचा एक वेगवेगळा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एकाच रंगाचा, पद्धतीचा बाथरोब परिधान केलेला दिसत आहे.
-
कोण आहे माहिका शर्मा?
माहिका शर्मा मॉडेल आहे. तिने अनेक प्रसिद्ध ब्रँडसाठी रॅम्प वॉक केलेला आहे. तसेच तिने संगीत व्हिडीओ आणि काही शॉर्फ फिल्म्समध्येही काम केले आहे. -
२४ वर्षीय माहिका शर्माने तिचे प्राथमिक शिक्षण दिल्लीच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमधून पूर्ण केले. तसेच गुजरातच्या गांधीनगर येथील दीनदयाल पेट्रोलियम विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र आणि वित्त या विषयांमध्ये कलाशाखेतून पदवी घेतली आहे.
-
शिक्षण पूर्ण केल्यानंतर माहिकाने मॉडेलिंग क्षेत्रात काम सुरू केले. आजवर तिने अनेक मोठ्या ब्रँडबरोबर काम केले आहे. तसेच तिला इंडियन फॅशन अवॉर्ड मॉडेल ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
-
अभिनेता विवेक ओबेरॉयच्या ‘नरेंद्र मोदी’ (२०१९) या चित्रपटात तिने लहानशी भूमिकाही केली आहे. याशिवाय काही जाहिरातींमध्येही तिने अभिनय केलेला आहे.
-
अनिता डोंगरे, रितू कुमार, तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा आणि अमित अग्रवाल यांसारख्या आघाडीच्या डिझायनर्ससाठी माहिका शर्माने मॉडलिंग केले आहे.

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…