-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या जॉली एलएलबी या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचा जॉली एलएलबी- ३ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Photo: Still from trailer)
-
दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला अक्षय ‘आपकी अदालत’ या टीव्ही शोमध्ये पोहोचला होता. तिथे त्याने त्याच्याशी संबंधित अनेक रंजक किस्से सांगितले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात… (Photo: India Tv/Youtube Channel)
-
गोविंदाने दिला सल्ला
बॉलिवूडचा सुपरडान्सर अभिनेता गोविंदाने मला अभिनेता होण्याचा सल्ला दिला होता असं अक्षयने यावेळी सांगितलं. अक्षय म्हणाला, “जय सेठ नावाचे एक छायाचित्रकार होते. मी त्यांच्याकडे लाईटमनचे काम करायचो. संगीता बिजलानी, जॅकी श्रॉफ, गोविंदा असे तेव्हाचे सर्वात मोठे स्टार्स तिथे येत असत. तेव्हा गोविंदा मला म्हणाला, ‘अरे, तू चांगला दिसतोस, तू अभिनेता हो.” (Photo: Still from trailer) -
७ वी नापास
अक्षयने तो सातवीत नापास झाल्याचा खुलासाही या मुलाखतीत केला. “सातवीत नापास झालो तेव्हा वडिलांनी कानफाडलं अन् मला विचारलं की तुला काय व्हायचं आहे? आणि मी त्यांना लगेच सांगितलं की मला अभिनेता व्हायचं आहे.” (Photo: Still from trailer) -
माझ्यानंतर गोविंदा असा दुसरा व्यक्ती होता की ज्याने मला अभिनेता हो असा सल्ला दिला होता, असं अक्षयने सांगितलं. (Photo: India Tv/Youtube Channel)
-
फ्लाईट चुकली अन्…
रॅम्पवॉक करण्यासाठी ठरलेल्या वेळेची फ्लाईट चुकली असंही यावेळी अक्षयने सांगितलं. “मला सकाळी ६ वाजताची फ्लाईट पकडणे गरजेचे असताना माझी ऐकण्यात गडबड झाली. मी सकाळी तयार नव्हतो. त्यावरुन मला सदरील व्यक्तीने तू अजिबात प्रोफेशनल नाहीस, तू आला नाहीस, अशा शब्दांत सुनावले. मी माफी मागत त्यांना स्पष्टीकरण दिले की सर मला वाटले की ती संध्याकाळची फ्लाईट आहे. मी विमानतळावर पोहोचलो तेव्हा फ्लाईट आधीच निघूनही गेली होती.” -
संध्याकाळी ६ वाजता पहिला चेक मिळाला…
देव जे काही करतो ते सर्व चांगल्यासाठीच करतो, असं सांगताना माझी आई मला धीर देत होती. मी माझे पोर्टफोलिओ फोटो घेऊन निर्मात्यांना भेटत राहिलो. असे, पुढे अक्षयने सांगितले. (Photo: Still from trailer) -
देवाचीच इच्छा असेल की…
याचदरम्यान मला नरेंद्र दादा नावाचे प्रमोद चक्रवर्तीचे मेकअप मॅन भेटले. त्यांनी मला पाहिले आणि तुला हिरो व्हायचं आहे का? असं विचारलं. मी हो म्हणालो. त्यांनी माझे फोटो घेतले आणि आत गेले. काही वेळानंतर पाच हजार रुपयांचा चेक दिला. मी तुम्हाला खरं सांगतो तो चेक मला ठि संध्याकाळी ६ वाजता मिळाला होता. देवाचीच इच्छा असेल की माझी ती फ्लाईट चुकावी, असा रंजक किस्साही अक्षयने यावेळी सांगितला. (Photo: India Tv/Youtube Channel) -
(Photo: Still from trailer)
हेही पाहा- आयफोन १७ भारतीयांनाच महाग! यूके, यूएसए ते जपान; जगातल्या १० देशांमध्ये त्याची किंमत किती? वाचा…

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”