-
‘रात्रीस खेळ चाले’मधील अभिनेत्री मंगल राणेने काही दिवसांपूर्वी आई झाल्याची खुशखबर शेअर केली होती.
-
३ ऑगस्ट रोजी मंगलला मुलगा झाल्याची खुशखबर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
-
अशातच मंगलनं लाडक्या लेकाचं बारसं केलं आहे आणि याचे काही खास क्षण तिनं शेअर केले आहेत.
-
मंगल राणेने आपल्या बाळाचं नाव ‘निहार’, असं ठेवलं आहे. तसंच तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
-
बाळाबरोबरचे फोटो शेअर करीत मंगलने “आम्ही आमच्या बाळाची ओळख जगाला प्रेमानं आणि अभिमानानं करून देत आहोत” असं म्हटलं आहे.
-
गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये मंगलनं फोटोग्राफर असलेल्या संतोष पेडणेकरबरोबर लग्न केलं.
-
जून महिन्यात मंगलचा डोहाळजेवणाचा (Baby Shower) कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आता तिनं लेकाचं बारसं केलं आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, ‘रात्रीस खेळ चाले’बरोबरच मंगलने ‘गाव गाता गजाली’, ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ व ‘संत गजानन शेगावीचे’ या मालिकांतही काम केलं आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल