-
बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर हिने तिच्या प्रियकर रोहन ठक्करसोबत ‘गोर धाना’ समारंभ साजरा केला आहे.
-
हा खास समारंभ २ ऑक्टोबर रोजी बोनी कपूर यांच्या निवासस्थानी फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला.
-
अंशुलाने या समारंभातील अनेक सुंदर फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात कपूर कुटुंब एकत्र दिसत आहे.
-
पहिल्या काही फोटोंमध्ये अंशुला आणि रोहन एकत्र पोज देताना अतिशय आनंदी आणि आकर्षक दिसत आहेत.
-
या प्रसंगी अंशुलाने जांभळ्या रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता, ज्यात ती अतिशय देखणी दिसत होती.
-
एका फोटोमध्ये बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि अंशुला एकत्र दिसले. ही कौटुंबिक छायाचित्रे सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत.
-
काही फोटोंमध्ये बोनी कपूर जोडप्याला आशीर्वाद देताना दिसले; तर जान्हवी आणि खुशी या दोघी होणाऱ्या जिजाजीसोबत फोटो क्लिक करताना दिसल्या.
-
हे फोटो शेअर करताना अंशुलाने लिहिले, “हा फक्त आमचा ‘गोर धाना‘ नव्हता; तर त्या प्रत्येक छोट्या क्षणात दिसणारे प्रेम होते.”
-
तिने पुढे लिहिले, “आईचे प्रेम आज प्रत्येक ठिकाणी जाणवत होते फुलांमध्ये, शब्दांमध्ये आणि त्या वातावरणात… जणू तिची उपस्थिती आमच्यासोबत होती.”
-
(सर्व फोटो सौजन्य : अर्जुन कपूर/इन्स्टाग्राम)

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण