-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
-
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय तिच्या आयुष्यातल्या अनेक अपडेट्सही देत असते.
-
अशातच अश्विनीने सोशल मीडियावर शेतीकाम करतानाचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्याबद्दल तिचं कौतुकही होत आहे.
-
“हे फक्त फोटो नाहीत तर यात भावना आहेत” अशी कॅप्शन देत अश्विनीने शेतातले फोटो शेअर केले आहेत.
-
शेतात राबल्यामुळे अभिनेत्री थकली असली; तरी या फोटोंमधून तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणि निखळ आनंद पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्रीच्या या साधेपणाचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. ‘रॉयल शेतकरीण’ आणि ‘शेतकऱ्याची लेक’ असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.
-
“अभिनेत्री असूनही मदत म्हणून शेतात काम करतेस हेच तुझं मोठेपण आहे”, “अभिनयातील ग्लॅमरसह मातीशी नाळ जोडलेली तुमची ही बाजू खूप प्रेरणादायक आहे”
-
तसंच “आभाळाला हात टेकून सुद्धा आपल्या काळ्या आईशी असलेले नाते घट्ट ठेवणारी आमची ताई”, या अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, अश्विनीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर अश्विनी पुन्हा स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”