-
‘स्टार प्रवाह’च्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या लोकप्रिय मालिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता माळवदकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
-
अमृताच्या लग्नसोहळ्यातील सुंदर फोटो तिच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अमृता माळवदकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमाचा लेखक विनायक पुरुषोत्तमशी लग्न केलं आहे.
-
निखिल बने, स्वानंदी बेर्डे, निमिष कुलकर्णी, आकांशा गाडे असे बरेच कलाकार अमृता- विनायकच्या हळदीला व लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
-
विनायक आणि अमृताने लग्न लागताना पारंपरिक लूक केला होता.
-
सुंदर लाल रंगाची साडी, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, गळ्यात नाजूक हार या लूकमध्ये अमृता फारच सुंदर दिसत होती.
-
अमृता व विनायक यांच्यावर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
अमृता व विनायक यांचा लग्नसोहळा साध्या व मराठमोळ्या संस्कृतीनुसार पार पडला. त्यामुळे नेटकऱ्यांनी या दोघांचं विशेष कौतुक केलं आहे.
-
या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अमृता आजवर अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. तर, विनायक पुरुषोत्तमला हास्यजत्रेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. ( सर्व फोटो सौजन्य : अमृता माळवदकर इन्स्टाग्राम अकाऊंट )

‘कर्करोग जिंकला, यंदा शेवटची दिवाळी पाहतोय’, २१ वर्षीय तरुणाची पोस्ट व्हायरल; लोक म्हणाले…