-
दाक्षिणात्य इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूड कलाविश्वामधलं चर्चेतलं नाव म्हणजे, अभिनेत्री रश्मिका मंदाना.
-
गेल्या काही वर्षांत, रश्मिका मंदानाने हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
विविध भाषांत काम करणाऱ्या रश्मिकाने गेली अनेक वर्ष कन्नड इंडस्ट्रीत काम केलेलं नाही.
-
याच कारणामुळे रश्मिकाला कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याची अफवा मध्यंतरी पसरली होती.
-
बॅन केल्याच्या या अफवेबद्दल आता स्वत: रश्मिकानं स्पष्टीकरण दिलं आहे.
-
Good News Kannada ला दिलेल्या मुलाखतीत तिनं कन्नड इंडस्ट्रीतून बॅन केल्याच्या चर्चांबद्दल उत्तर दिलं.
-
याबद्दल रश्मिका मोजक्या शब्दांत म्हणाली की, “अजूनपर्यंत तरी कुणी मला बॅन केलेलं नाही”. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, रश्मिकाचा नुकताच ‘थम्मा’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यात ती आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे.

‘सुंदरी सुंदरी’, गाण्यावर माय-लेकाने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट