-
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने मुंबईत नवीन घर घेतलं आहे.
-
भाग्यश्री मोटेने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. तिने घराची झलकही फोटो दाखवली आहे.
-
भाग्यश्री मोटेने कुटुंबियांबरोबर नवीन घरात गृहप्रवेश केला.
-
मोठ्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू आणि स्वतःचा साखरपुडा मोडल्यानंतर भाग्यश्री मोटे तिचं स्वप्न पूर्ण करत आहे.
-
स्वप्नपूर्ती.
सुमारे १४ वर्षांपूर्वी मी मुंबईत येणं-जाणं सुरू केलं. त्यावेळी राहायला जागा नसल्याने एका दिवसात येऊन, ऑडिशन्स देऊन, भेटीगाठी करून पुण्याला परत जावं लागायचं.- भाग्यश्री मोटे -
आणि आजचा दिवस… या स्वप्ननगरीत माझं हक्काचं घर झालंय.- भाग्यश्री मोटे
-
या खास दिवशी भाग्यश्रीला तिच्या मोठ्या बहिणीची आठवण आली.
-
बाळ तू हवी होतीस, तुझी खूप आठवण येतीये, तुझ्या इतकं आनंदी आज दुसरं कोणी नसतं आणि तो आनंद बघण्याचं नशीब मला लाभलं असतं. असो. असशील तिथे तू खूप खूश राहा. आणि माझा अभिमान बाळगत असशील हे तर मला माहितीच आहे. – भाग्यश्री मोटे
-
खूप कृतज्ञ आहे, सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं, साथ दिली. खूप खूप धन्यवाद आणि आभार. – भाग्यश्री मोटे
-
माझ्यावरचं प्रेम आणि समर्थन असंच राहू द्या!, असं कॅप्शन भाग्यश्री मोटेने या फोटोंना दिलं आहे.
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज