-
Veen Doghatli Hi Tutena TV Serial Update: झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत सध्या लग्नाचं वातावरण आहे.
-
या मालिकेत राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्नसोहळ्याचा आनंद घेत आहेत.
-
आधिरा आणि स्वानंदीच्या चूडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रशनचा उत्साह आहे.
-
मात्र, या आनंदात एक अनपेक्षित वळण येणार आहे, ज्यामुळे सर्वजण चकित होणार आहेत.
-
स्वानंदीच्या चूडा सोहळ्यात सोन्याच्या बांगड्यांच्या जागी बेंटेक्सच्या बांगड्या येतात.
-
स्वानंदीच्या हातात सोन्याऐवजी बेंटेक्सच्या बांगड्या चढवल्या जातात. सध्यातरी ही गोष्ट कोणाच्या लक्षात नाहीये.
-
या घटनेमागे कोणाचा हात आहे, हा प्रश्न सर्वांना विचारात टाकणारा ठरणार आहे.
-
दरम्यान, राजवाडे कुटुंबातही एक वेगळीच अडचण उभी राहते. आधिराच्या चूडा विधीमध्ये अचानक घडलेल्या या अपघातामुळे समारंभातील वातावरण बदलत.
-
आनंदी वातावरणात अचानक आलेला हा अपशकुन कुटुंबासाठी धक्कादायक ठरणार आहे.
-
या प्रसंगानंतर समर समोर दोन्ही कुटुंबांमधील परिस्थिती शांत करण्याचं एक मोठ आव्हान उभं आहे.
-
आता या घटनेमागील सत्य उलगडत असताना अनेक नाती परिक्षेत उतरतात.
-
‘वीण दोघांतली ही तुटेना’ पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना भावनांचा आणि कौटुंबिक नात्यांच्या सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.
-
सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उघड होणारं सत्य कोणते असेल आणि या घटनांनंतर नात्यांची वीण पुन्हा जुळेल का?
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..