-
स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे, सारिका/निहारिका साळुंखे.
-
‘पिंकीचा विजय असो’ मालिकमध्ये सारिका/निहारिकानं ‘निरी डॉल्बी धोंडे-पाटील’ ही पिंकीच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
-
‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेआधी सारिका/निहारिकानं काही शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे.
-
मात्र, स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमधील निरी भूमिकेमुळे सारिका/निहारिकानं घराघरांत लोकप्रिय झाली.
-
सारिका/निहारिका सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश लूक्समधील फोटो शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
अशातच सारिका/निहारिकानं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना स्वत:च्या गावात नवा व्यवसाय सुरू केल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
-
सारिका/निहारिकानं पाटण तालुक्यातील कातवडी (मेष्टेवाडी) या स्वत:च्या गावात पेपर प्लेट्स आणि द्रोण विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
-
सारिका/निहारिकाच्या या नव्या व्यवसायाबद्दल तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच या नव्या व्यवसायासाठी तिचं कौतुकही केलं आहे.
-
“अभिनंदन”, “काम कुठलंही असो मेहनत करतेयस ना? ते महत्वाचं”, “खुप खूप शुभेच्छा” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..