-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अर्चना गौतम हिनं नुकतंच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलंय. त्यामुळे अभिनेत्री अर्चना आता बिजनेसवूमन झाली आहे.
-
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अर्चना गौतमनं मुंबईत स्वत:चा कॅफे सुरू केला आहे आणि या कॅफेचं उद्घाटन ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यानी केलं आहे.
-
अर्चना सोशल मीडियावर तिचे दैनंदिन अपडेट्स शेअर करत असते. अशातच काही दिवसांपूर्वी तिनं या कॅफेचे खास फोटो शेअर केले आणि उषा नाडकर्णींचे आभारही मानले.
-
या फोटोसह अर्चनानं म्हटलं, “जे लोक आपले असतात, ते नेहमीच आपल्याशी मनानं जोडलेले राहतात. उषा नाडकर्णी तुमचे मनःपूर्वक आभार.”
-
यानंतर अर्चनानं कॅफेचे उद्घाटन तुमच्या हातून झालं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. नव्या प्रवासासाठी तुमचे आशीर्वाद मिळणं, ही खूप सुंदर सुरुवात आहे” असंही म्हटलं.
-
अर्चना गौतमच्या मुंबईतील या नव्या कॅफेचं नाव Oye Churros असं आहे. दरम्यान, अर्चनाच्या या नव्या कॅफेसाठी तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं कौतुक केलं आहे.
-
अर्चनाबद्दल सांगायचं झाल्यास, २०१५ मध्ये आलेल्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या बॉलीवूड चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून अर्चनानं अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. तिनं ‘हसीना पारकर’ आणि ‘बारात कंपनी’सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
अर्चना ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं ‘साथ निभाना साथिया’ आणि ‘ये है आशिकी’सारख्या टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
याशिवाय अर्चनाने ‘बिग बॉस १६’मध्येही सहभागी घेतला होता आणि नंतर ‘खतरों के खिलाडी’मध्येही ती दिसली होती. शिवाय नुकताच तिनं ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा शोदेखील केला.
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…