-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त आज अर्थवशीर्ष पठण करण्यात आले.
-
पहाटे झालेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये उत्सव मंडपासमोर ३१ हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले.
-
अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाच ३५ वं वर्ष आहे.
-
पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती.
-
उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगांनी भरून गेला होता.
-
महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केले.
-
हात उंचावून टाळ्यांचा गजर करत महिलांनी गणरायाला अभिवादन केले.
-
गणेश नामाच्या जयघोषाने महिलांनी केलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामुळे पुणेकरांची आजची पहाट मंगलमय झाली.
-
प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
-
परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यावेळी उपस्थित होत्या.
-
यावेळी समाज सुधारणेबरोबरच समाजाच्या विकासाठीसाठी मोलाचे योदान देणाऱ्या व्यक्तींचे पोस्टर्स अडकवून काही मुली कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
-
या कार्यक्रमाला ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव आदी मान्यवरही उपस्थित होते.

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…