-
गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे.
-
मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे.
-
ही छायाचित्रे मुंबईतील आहेत.
-
लालबाग, काळाचौकी, चिंचपोकळी परिसरात गणेश विसर्जनसाठी मोठी गर्दी जमली आहे.
-
गिरगाव चौपाटीवर मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
-
लालबागचा राजा
-
मंडपातून बाहेर निघाला तो क्षण
-
लालबागचा राजाचे शेवटच्या दिवशी का होईना दर्शन लाभावे म्हणून भक्तांनी गर्दी केली आहे.
-
भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला भाविक आज निरोप देणार आहेत.
-
दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला यंदा बाप्पाचे आगमन झाले.
-
आज अनंत चतुर्थी १७ सप्टेंबर रोजी बाप्पाचा दहा दिवस पाहुणचार केल्यानंतर विसर्जन केले जाणार आहे.
-
मुंबईतील लालबाग परिसरात सध्या तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे.
-
पोलीस यंत्रणा यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज आहे. त्याव्यतिरिक्त मिरवणूक जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूकही तात्पुरती इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.
-
(Express Photos By deepak Joshi & Sankhdeep Banerjee)

Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश