-
सध्या देशासह राज्यामध्ये गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळते आहे. अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या घरीही यावेळी बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहाने केलं जात आहे.
-
त्याचवेळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या घरातल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले.
-
मुंबईतल्या मराठी मेळाव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे.
-
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे युतीची शक्यता वाढली असल्याची चर्चा जोर धरत आहे.
-
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवर अचानक दाखल होतं त्यांच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
-
दरम्यान, यावेळी दोन्ही बंधू पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या अंदाजात पाहायला मिळाले.
-
दोघांनीही बाप्पाबरोबर फोटोशूट केलं आणि सोशल मीडियावरही शेअर केलं आहे.
-
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्याने सेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
-
राज ठाकरेंच्या शिवतीर्थमधला गणपती (सर्व फोटो शिवसेनाUBT/ सोशल मीडिया) हेही पाहा- Photos : लोकप्रिय मराठी अभिनेत्रींच्या घरचे बाप्पा; ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत दाखवली गणरायाची झलक

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार