-
उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. आंबा असं म्हटलं तरी प्रत्येकाच्या तोडांला पाणी सुटतं.
-
विशेष म्हणजे आंबा हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर गोड, रसाळ, पिवळसर केशरी रंगाचा ‘हापूस आंबा’ दिसायला लागतो.
-
कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते.
-
सध्या बाजारातील अनेक विक्रेते सामान्य हापूस म्हणून कोणताही आंबा ‘हापूस आंबा’ किंवा ‘अल्फान्जो आंबा’ या नावाने विकतात.
-
त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण झाले आहे. हापूस आंबा ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
-
हापूस आंब्याच्या चवीने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. त्यामुळे या फळाची चव इतर कोणत्याही आंब्याच्या प्रजातीला येत नाही.
-
हापूस आंबा हे कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते.
-
विशेष म्हणजे कोकणाव्यक्तिरिक्त या फळाची लागवड इतर कुठेही केली, तर त्याला ती विशिष्ट चव येत नाही. म्हणूनच हापूस आंब्याला कोकणचा राजा म्हणून ओळखतात.
-
चांगली गुणवत्ता असलेला हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही पटकन ओळखता येतो.
-
नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो.
-
इतर भागातून येणारे आंबे जे दिसायला जरी हापूस आंब्यासारखे असेल तरी त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित त्याला गंध येतो.
-
हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते अजिबात सुगंध देत नाहीत.
-
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचे जाणवतात. तेच रासायनिकरीत्या पिकलेले आंबे पिवळे आणि कठोर असतात.
-
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग हा पिवळसर आणि फिकट हिरवा असतो. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे एकसारख्याच रंगाचे दिसतात.
-
पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर अजिबात चिकटून बसत नाही.
-
हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून तो सहजरित्या ओळखता येतो.
-
जर तुम्ही घरी आंबे आणले असतील तर ते एका मोठया भांड्यात पाणी घेऊन त्यात बुडवून ठेवा.
-
जर तो आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकवण्यात आला आहे, असे समजावे.
-
मात्र जर आंबा पाण्यावर तरंगत असेल तर आंबा रसायने वापरुन पिकवलेला आहे, हे स्पष्ट होते.

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल