-
लिंबाचे अनेक फायदे आपण आजवर ऐकले असतील. पण कडवट चवीच्या लिंबाच्या सालीतही कमालीचे गुण आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का?
-
घरातील स्वच्छता ते शरीराची निगा राखण्यापर्यंत रोजच्या समस्यांसाठी लिंबाच्या साली अशा वापरून पहा.
-
किचनची स्वच्छता करताना लिंबाची साल वापरून पाहा. शेगडीवरचे डाग, किचनच्या भिंतीवर उडालेल्या तेलाचे डाग सर्व काही क्षणात गायब करण्यासाठी लिंबाची साल, व्हाईट व्हिनेगर व पाणी मिक्स करून डागांवर लावा.
-
घरातील कुबट वास घालवण्यासाठी लिंबूची साल किसून व्हिनेगर व पाण्यासह मिश्रण तयार करा, हे पाणी घरभर स्प्रे करून घरात फ्रेश सुगंध पसरवू शकता.
-
लिंबाची साल आरोग्यासाठीही गुणकारी आहे. लिंबाच्या सालीचा चहा तुम्हाला अपचनावर समाधान ठरू शकतो. विशेषतः मधुमेहींसाठी हा चहा उत्तम आहे.
-
लिंबाच्या सालीचा चहा बनवण्यासाठी उकळत्या पाण्यात चहा पावडर, सैंधव मीठ व काळीमिरी टाकून चहा बनवा. पित्त, अपचन, बद्धकोष्ठ यावर हे गुणकारी ठरते.
-
घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी, मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.
-
जेवणात लिंबाची साल वापरताना किसून वापरा. यामुळे जेवण चवीलाही उत्तम होते तसेच जास्त वेळ टिकून राहते.
-
संशोधकांच्या माहितीनुसार, लिंबाच्या सालीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे तोंड येणे, ओठावर फोड येणे असे आजार होत नाहीत.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”