-
सर्वत्र नवरात्रीचे नऊ दिवस जल्लोषात साजरे करण्यात येत आहेत. बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. यावेळी शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते.
-
त्यासाठी फळं किंवा फळांचा रस घेतला जातो. पण जर मधुमेह असणाऱ्या व्यक्ती उपवास करणार असतील तर त्यांना डाएटकडे विशेष लक्ष द्यावे लागते. काही फळं नैसर्गिकरित्या गोड असतात, त्यामुळे अशा फळांचे अतिसेवन रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात.
-
अशावेळी मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी कशाप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी जाणून घ्या.
-
खूप वेळ उपाशी राहू नका : योग्य वेळेच्या अंतराने अन्नपदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जास्त वेळ उपाशी राहू नये असा सल्ला दिला जातो. अशात जर या व्यक्ती उपवास करणार असतील तर त्यांनी थोड्या वेळाच्या अंतराने काही हेल्दी पदार्थ खावे.
-
जास्त चहा पिणे टाळा : मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अति चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो उपवासातही मधुमेह असणाऱ्यांनी जास्त चहा पिणे टाळावे. चहा व्यतिरिक्त तुम्ही लस्सी, ताक, नारळाचे पाणी, लिंबू पाणी पिऊ शकता.
-
औषधं वेळेवर घ्या : उपवासादरम्यान रोजचा आहार घेत नसल्याने मधुमेहाचे रुग्ण औषध घेणं टाळतात, परंतु याचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर औषधं, इन्सुलिन डोस घेणे आवश्यक आहे.
-
तेलकट पदार्थ खाणे टाळा : नवरात्रीमध्ये बहुतेक अन्नपदार्थ तळलेले असतात. तळलेले अन्नपदार्थ जास्त खाण्याऐवजी फक्त उकडलेले, भाजलेले, वाफेवर शिजवलेले पदार्थ खावेत. तुम्ही भाजलेले किंवा उकडलेले रताळे मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. याशिवाय कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाऊ शकता.
-
बटाटा खाणे टाळा : उपवासाच्या पदार्थांमध्ये बटाटा जास्त प्रमाणात वापरला जातो. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी उपावासादरम्यान जास्त बटाटा खाणे टाळावे.
-
दुग्धजन्य पदार्थ : उपवासादरम्यान शरीरातील प्रोटीनची पातळी कायम ठेवण्यासाठी मधूमेहाचे रुग्ण दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकतात. दही, दुध, पनीर असे पदार्थ खाता येतील.
-
डॉक्टरांचा सल्ला घ्या : उपवास करण्यापुर्वी मधुमेह असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.) (फोटो सौजन्य : Freepik/Pexels)

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल