-
पाणी आपल्या निरोगी शरीरासाठी खूपच महत्त्वाचे आहे. असे म्हणतात आपल्या शरीराचा ७० टक्के भाग पाण्याने बनला आहे. आरोग्य तज्ञ देखील दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
-
परंतु, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेवताना पाणी पिणे टाळायला हवे. जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने अनेक दुष्परिणाम जाणवू शकतात.
-
ज्या व्यक्ती जेवल्यावर लगेचच पाणी पितात त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
-
आरोग्य तज्ञांनुसार खाल्लेले अन्न पचायला जवळपास २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
-
म्हणूनच जेवल्यावर किमान ४५ ते ५० मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. तसेच, जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे.
-
जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
-
योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया बरोबर आणि मजबूत राहते.
-
पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होणार नाही.
-
शरीर अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेते.
-
योग्य वेळी पाणी प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
-
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
-
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. Photos: Pexels)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case