-
मधुमेहाच्या रुग्णांना आहाराची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.
-
निरोगी आहार अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतो, तसेच त्यामध्ये भरपूर फायबर असते. फायबरयुक्त पदार्थ रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात.
-
मार्च २०१८ च्या जर्नल ऑफ कायरोप्रॅक्टिक मेडिसिन रिव्ह्यूच्या संशोधकांच्या मते, टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
-
या पदार्थांमध्ये ब्राऊन राईस, बार्ली आणि क्विनोआ, सोयाबीन, शेंगा, राजमा, गार्बानझो, मटार, ओट्स, रास्पबेरी तसेच सफरचंद आणि नाशपाती यांचा समावेश होतो.
-
फायबरचे दोन प्रकार आहेत, एक विद्राव्य फायबर आणि दुसरा अविद्राव्य फायबर. मधुमेही रुग्णांसाठी दोन्ही प्रकारचे फायबर फायदेशीर असले तरी तज्ज्ञ विद्राव्य फायबरवर अधिक भर देण्याचा सल्ला देतात.
-
विद्राव्य फायबर कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
-
फायबरचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही कारण ते पचवता येत नाही. फायबरच्या सेवनाने रक्तातील साखरेवरील कार्बोहायड्रेट्सचा प्रभाव कमी होतो.
-
कार्बोहायड्रेट पचल्यावर साखरेमध्ये मोडतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. फायबर समृध्द अन्न पचण्यासाठी आतड्यांना थोडा जास्त वेळ लागतो आणि यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते.
-
टाइप २ मधुमेहाच्या रूग्णांसाठी एका दिवसात किती फायबर आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
-
अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (ADA) नुसार, मधुमेहाच्या रुग्णांना साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज प्रति एक हजार कॅलरीजमध्ये किमान १४ ग्रॅम फायबरचे सेवन करणे आवश्यक आहे.
-
फायबर मिळवण्यासाठी अळशी, कडधान्ये, मेथी दाणे, पेरू आणि तृणधान्यांचा आहारात समावेश करावा. हे सर्व पदार्थ तुमची रोजची फायबरची गरज सहज पूर्ण करतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाला ‘येमेन’मध्ये दिलासा, फाशीची शिक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित