-
यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो रक्त शुद्ध करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. तेलकट-मसालेदार अन्न, तूप, लोणी, मलईदार दूध आणि मटण यांचा समावेश असलेला आहार घेतल्यास यकृतात फॅटस जमा होते आणि यकृताच्या आजारांचा धोका वाढतो.
-
अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे यकृत खराब होण्याचा धोका देखील वाढतो.
-
यकृतामध्ये बिघाड झाला की त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. भूक न लागणे, उलट्या होणे, झोप न लागणे, दिवसभर थकवा आणि सुस्त वाटणे, वजन कमी होणे ही यकृताच्या समस्यांची लक्षणे असू शकतात. यकृत निरोगी ठेवण्यासाठी आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
-
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ओवा खूप प्रभावी असल्याचे म्हटले जाते. ओव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण घटक आहेत. हे अनेक बायोएक्टिव्ह संयुगाने बनलेल्या तेलाने समृद्ध आहे. या तेलामुळेच त्याचे औषधी महत्त्व अधिक आहे.
-
ओव्याला डायजेस्टिव्ह फायबरचा चांगला स्त्रोत मानले जाते. यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये जबरदस्त उपचार आणि उपचारात्मक गुणधर्म आहेत.
-
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला ओवा यकृत निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, ओव्याचे पाणी उकळल्यानंतर त्याचे सेवन केल्यास यकृताच्या आजारांपासून आराम मिळतो.
-
ओवा यकृत कसे निरोगी ठेवते आणि त्याचे सेवन केल्याने कोणकोणते आजार बरे होतात ते जाणून घेऊया.
-
जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर मद्यपान करत असाल किंवा मद्यपानामुळे तुमचे यकृत खराब झाले असेल तर तुम्ही ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठीदेखील ओव्याचे पाणी प्रभावी आहे.
-
ओव्याचे नियमित सेवन केल्याने यकृताचे कार्य सुरळीत होते, त्याचबरोबर अन्नातील पोषक तत्वांचे शोषण वाढण्यास मदत होते.
-
ओव्याचे पाणी बनवण्यासाठी ८०० मिली पाण्यात १०० ग्रॅम ओवा घेऊन ते पाणी २५० मिलीपर्यंत कमी होईपर्यंत उकळावे.
-
जेवणापूर्वी एक कप हे पाणी प्या. याचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते आणि दारूच्या व्यसनातूनही सुटका होते.
-
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध असलेले ओव्याचे पाणी हृदयरोग्यांसाठी वरदान आहे. अँटिऑक्सिडंट खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि हृदय निरोगी ठेवते. (Photos: Freepik)

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात…