-
आपण नेहमी सकाळी नाश्ता करतो, पण नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती तुम्हाला माहिती आहे का? जर आपण योग्य वेळेत नाश्ता करत नसेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. (Photo : Pexels)
-
वेळवर नाश्ता न केल्यामुळे आपली एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते आणि याच कारणाने आपल्याला दिवसभर थकवा जाणवू शकतो. त्यामुळे हेल्दी लाइफस्टाइलसाठी सकाळचा नाश्ता योग्य वेळेत करणे गरजेचे आहे. (Photo : Pexels)
-
नाश्ता करण्याची योग्य वेळ सकाळी ७ ते ८च्या दरम्यानची मानली जाते. पण, काही कारणास्तव तुम्ही या वेळेत नाश्ता करू शकला नाही तर सकाळी १० वाजेपर्यंत नाश्ता करावा. (Photo : Pexels)
-
तज्ज्ञांच्या मते, झोपून उठल्यानंतर एका तासाच्या आत नाश्ता करणे गरजेचे आहे. हा बेस्ट टाइम असतो. त्यामुळे तुमची उठायची वेळ कोणती, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. (Photo : Pexels)
-
रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्ही उपाशी असता, तेव्हा शरीराला ऊर्जेची अत्यंत आवश्यकता असते. सकाळी शरीरातील ग्लुकोजची मात्रा खूप कमी असते. (Photo : Pexels)
-
नाश्ता केल्यानंतर आपली पचनक्रिया ॲक्टिव्ह होते आणि आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. (Photo : Pexels)
-
सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी असावा. सकाळी नाश्त्यात फळे, हेल्दी भाज्या आणि फायबरयुक्त अन्नाचे सेवन करावे. (Photo : Pexels)
-
तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स, रवा इडली किंवा डोसा, उपमा, फळे आणि उकडलेली अंडी खाऊ शकता. (Photo : Pexels)
-
सकाळचा नाश्ता भरपूर करावा, ज्यामुळे फार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहू शकते. (Photo : Pexels)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस