-
निरोगी राहण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल हा महत्त्वाचा पैलू मानला जातो. एखादा व्यक्तीला त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी दिवसभर सक्रिय असणे अत्यंत आवश्यक असते.
-
बऱ्याचदा व्यस्त आणि धावपळीच्या दिनचर्येमध्ये चांगली जीवनशैली राखण्यासाठी लोकांना शारीरिक हालचालीसाठी वेळ काढणे फार अवघड असते. त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये ते अधिकाधिक मग्न झाल्याने त्यांच्यासाठी हे सर्व कठीण होते.
-
पण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाला थोडाफार वेळ स्वत:साठी काढला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला सोप्या गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवू शकता.
-
१. डान्स क्लासमध्ये जा
डान्स किंवा नृत्य ही एक कला आहे. ही कला भाव व्यक्त करण्यासाठी असली तरी शारिरीक हालचालीसाठी उत्तम पर्याय आहे दे तुम्हाला प्रेरणा देत राहील. सर्व सामन्यांपैकी डान्सर हे नेहमी निरोगी राहतात आणि निरोगी जीवनशैली आत्मसात करतात. डान्स किंवा नृत्य करणे हा सक्रिय राहण्याचा आणि एखाद्या व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचा उत्तम मार्ग आहे. -
२. तुमचे घर स्वच्छ करा
स्वच्छतेची सुरुवात ही घरापासून होते पण घराची स्वच्छता ठेवल्याने एखादी व्यक्ती सक्रिय राहते आणि चांगली शारीरिक क्षमता निर्माण होते. -
झाडून काढणे. धूळ पुसणे आणि फरशी पुसणे या अशा गोष्टी करुन घरात स्वच्छता ठेवू शकता आणि या सर्व गोष्टी रोज करत असाल तर तुमच्या दैनदिन कामामध्ये तुम्हाला मदत होईल.
-
३. टिव्ही पाहात व्यायाम करणे
टिव्ही पाहताना जर तुम्ही काही शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. या शारीरिक हालचालींमध्ये सीट-अपस मारणे, साधे खांदे वक्राकार फिरवणे किंवा स्ट्रेचिंग करणे अशा गोष्टी करता येऊ शकतात. -
४. जेव्हा शक्य आहे तेव्हा चाला.
चालणे ही अशी दिवसभरातील सामान्य क्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्ती दररोज ठराविक पाऊले चालतो. पण ज्या लोकांना दिवसभरात दिर्घकाळ चालण्यासाठी वेळ मिळत नाही ते जवळच्या ठिकाणी चालत जाऊ शकता. बाईक किंवा कार अशा कोणत्याही वाहनाने जाण्याऐवजी जर जवळच्या दुकानात तुम्ही चालत गेलात तर तुमची शारीरिक हालचाल होईल आणि तुम्ही सक्रिय राहाल. -
५. योगा करा
नियमित योगा केल्यात तुम्हाला लवचकिता मिळेल आणि तुम्हाला तणावातून मुक्ती मिळेल. योगा ही एक सामान्य क्रिया आहे जी तुमचे मन शांत करते आणि शरीराला उर्जा प्रदान करते.

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल