-
कमी घनता असलेले लिपोप्रोटीन (LDL) किंवा खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदय आणि ह्रदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो असं म्हणतात; पण याशिवायही कोलेस्ट्रॉलचा एक आणखी प्रकार आहे, ज्यापासून प्रत्येकाने सावध असणे गरजेचे आहे, याला स्टिकी (चिकटलेला) कोलेस्ट्रॉल (Lp(a)) म्हणतात. (Photo : Freepik)
-
हा कोलेस्ट्रॉल हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये जबरदस्तीने घुसतो आणि हा इतका चिकट असतो की, हालचालही करू शकत नाही, ज्यामुळे प्लेक (Plaque) तयार होतात. विशेष म्हणजे अनेक भारतीयांमध्ये हा कोलेस्ट्रॉल आढळून येतो. कमी वयातील मुलामुलींमध्येसुद्धा हा कोलेस्ट्रॉल आढळून येऊ शकतो. त्यामुळे त्यांनासुद्धा हार्ट अटॅक येण्याचा धोका हल्ली वाढला आहे. (Photo : Freepik)
-
Lp(a) हा हार्टच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक घटक आहे. Lp(a) ची पातळी किती, हे पाहण्यासाठी लिपिड प्रोफाइल घ्यावी. त्यातून Lp(a) ची पातळी दिसून येईल. (Photo : Freepik)
-
एमआर (Nuclear Magnetic Resonance ) हे पार्टिकल ॲनालिसीस आणि ग्रॅडीअंट जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे, जे दोन्ही LDL च्या प्रकारांची प्रमाण आणि गुणवत्ता वेगळे करू शकतात. जर मधुमेह 35 पेक्षा कमी एचडीएल आणि 250 च्या वर ट्रायग्लिसराइड्सचा असेल, तर तुमच्यात लिपोप्रोटीनची पातळी कमी आहे. (Photo : Freepik)
-
“Lp(a) साठी विशिष्ट कोणतेही उपचार नाही. औषधे किंवा स्टॅटीन त्यावर तितके प्रभावी नसतात.
evolocumab (Repatha) किंवा alirocumab (Praluent) सारख्या PCSK9 इनहिबिटर म्हणून ओळखल्या जाणार्या इंजेक्टेबल कोलेस्ट्रॉल करणाऱ्या औषधी Lp(a) जवळपास 30 टक्क्यांनी कमी करू शकतात, असे म्हटले जाते. पण, ही औषधी तितकी प्रभावी नसतात. (Photo : Freepik) -
हार्ट अटॅक आणि हार्टशी संबंधित गंभीर आजार टाळण्यासाठी तुम्हाला Lp(a) पातळी कमी करणे आवश्यक आहे.” असे पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया येथील कार्डिओलॉजिस्ट आणि प्राध्यापक डॉ. रेड्डी सांगतात. (Photo : Freepik)
-
जोपर्यंत औषधे तयार होत नाही, तोपर्यंत आपण स्टिकी कोलेस्ट्रॉल (Lp(a)) कसे कमी करावे?
डॉ. रेड्डी सांगतात, जर तुमच्या शरीरातील LDL ची पातळी 50 mg/dL पेक्षा कमी असेल, तर याचा फायदा होऊ शकतो. याशिवाय तुम्हाला तुमचा आहार आणि लाइफस्टाइल पॅटर्न पूर्णपणे बदलावा लागेल. (Photo : Freepik) -
डॉ. सिंग सुद्धा म्हणतात, “LDL ची पातळी कमी करणे हा एकमेव उपाय आहे.”
न्यूयॉर्क सेंटर फॉर प्रिव्हेंशन ऑफ हार्ट डिसीजनुसार, ज्या लोकांच्या शरीरात लहान LDLअसते, त्या लोकांमध्ये ३०० टक्के जास्त हार्टचा आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळेच ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो, त्यातील ५० टक्के लोकांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असते. (Photo : Freepik) -
योग्य आहार आणि LDL पातळीत सुधारणा यामुळेही दहा टक्क्यांनी हार्ट अटॅकचा धोका कमी करू शकता येतो. हे औषधांशिवाय शक्य नाही, पण याशिवाय फळे, भाज्या, मासे आणि कमी फॅट असलेले दूध इत्यादींचा आहारात समावेश करावा, असे डॉ. सिंग सांगतात. (Photo : Freepik)

नरेंद्र मोदी पंतप्रधान का बनले? सरन्यायाधीश भूषण गवईंनी थेट लंडनमधून सांगितले…