-
कोलेस्ट्रॉल वाढणे आजच्या काळात मोठी समस्या बनली आहे. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यामुळे सर्वाधिक धोका हा आपल्या हृदयाला होतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दैनंदिन आहारातील अन्न आणि स्नॅक्स महत्वाची भूमिका बजावतात.तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील काही सुपरफूड गुणकारी ठरू शकतात.(फोटो : Freepik)
-
१. चना चाट : भाजलेले चणे आणि मसाला घालून तुम्ही चना चाट घरी तयार करा. एक कुरकुरीत आणि प्रथिनांनी भरपूर असा स्नॅक आहे ; जो कोलेस्ट्रॉल वाढवत नाही. (फोटो : Freepik)
-
३. स्प्राउट्स चाट : स्प्राउट्स म्हणजे अंकुरलेले संपूर्ण धान्य. स्प्राउट्स चाट हे एक सुपर फूड आहेत. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने कमी होते. एक कप स्प्राउट्समध्ये फक्त १४ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय यामध्ये ६ ग्रॅम डायटरी फायबर असते जे पचनशक्ती मजबूत करते.(फोटो : Freepik)
-
४. भेल पुरी :तळलेले पदार्थ बाजूला ठेवून मुरमुरेची भेळ पुरी तयार करा. चिंचेची चटणी, ताज्या भाज्या आणि कमीत कमी मसाल्यांसह या भेलपुरीची चव वाढवा.(फोटो : Freepik)
-
५. ह्युमस खाकरा : फायबरने समृद्ध आणि हृदयासाठी आरोग्यदायी असा हा ह्युमस खाकरा तुम्ही घरी बनवू शकता.(फोटो: Freepik)
-
६. पालक ढोकळा : ढोकळ्यामध्ये पोषक घटकांनी भरलेले पालक समाविष्ट करा आणि स्वादिष्ट, हेल्थी नाश्ता तयार करा.(फोटो: Freepik)
-
७. खमण ढोकळा : आंबलेल्या बेसनापासून बनवलेला खमन ढोकळा हा हलका नाश्ता आहे ; ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी आणि चव जास्त असते.
(फोटो : Pixabay) -
८. नाचणीचे चिप्स : बटाट्याच्या चिप्सच्या जागी नाचणीच्या चिप्स खा. हे कुरकुरीत, पौष्टिक नाचणीचे चिप्स शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहायला मदत करते.(फोटो : Freepik)
-
९. पोह्याचे कटलेट : हेल्दी आणि वेगळा नाश्ता हवा असेल तर भाजी आणि मसाले घालून पोह्याचे कटलेट तयार करा. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी पोह्यांचे कटलेट हा एक उत्तम पर्याय आहे.(फोटो : Freepik)
