-
आपल्या देशात इतके सण आणेक की एक सण संपत नाही की दुसऱ्या सणाची तयारी सुरू होते. याच सण-समारंभाच्या काळात वेगवेगळे पदार्थ, मिठाई, पक्वान्न मोठ्या प्रमाणावर बनवले जातात.
-
खवय्यांसाठी तर हा सणांचा काळ मेजवानीचा असतो. कारण या दिवसांमध्ये सगळीकडे चविष्ट पदार्थ अमर्यादित प्रमाणात खायला मिळतात.
-
फक्त खवय्ये मंडळीच नाही तर अगदी रोज डायट करणारे देखील सणांच्या दिवसात डायट विसरून आवडीचे पदार्थ मनसोक्त खाताना दिसतात.
-
या दिवसांमध्ये मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटी होतात आणि अशात त्यांच्या आग्रहास्तव दोन घास जास्तच खावे लागतात.
-
सणांच्या या दिवसांमध्ये आपले आरोग्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होते. जास्त जेवल्याने त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याला नुकसानदायक ठरणाऱ्या गोष्टी टाळणे आवश्यक असते. त्यासाठी काय उपाय करता येतील जाणून घेऊया.
-
सणांच्या दिवसात आपले जेवणाचे निश्चित वेळापत्रक नसते. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही वेळा आपण गरजेपेक्षा जास्त खातो आणि मग त्या दिवसात इतर काही खाणे टाळतो, असे करणे चुकीचे आहे.
-
तज्ञांच्या मते निरोगी राहण्यासाठी जेवण वेळेवर करणे आवश्यक असते. आरोग्याला होणारे नुकसान टाळण्यासाठी जेवणाची वेळ पाळा.
-
सणांच्या दिवसात जंक फूड आणि तळलेले अन्नपदार्थ खूप खाल्ले जातात. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाऊ शकते.
-
याऐवजी मुबलक प्रमाणात फायबर असणाऱ्या पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करावा. काकडी, गाजर, कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्या फायबरचे चांगले स्त्रोत आहेत. फायबरयुक्त अन्न घेतल्याने लवकर भूक लागत नाही.
-
पाणी प्यायल्याने गोड खाण्याची क्रेविंग कमी होते. निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच जास्त पाणी प्यायल्याने भूक लागत नाही आणि मॅटाबॉलिजम बुस्ट होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
-
झोप पुर्ण न झाल्यास जास्त भूक लागण्याची शक्यता असते. सणांच्या काळात सर्व तयारीच्या गडबडीमध्ये झोप पुर्ण होत नाही. अशावेळी जास्त भूक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.
-
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (Photos: Freepik)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल