-
गाजर हे अतिशय पौष्टिक असून यात अनेक पोषक घटक आहेत. सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात अनेक जण आवडीने गाजर खातात. गाजराचा ज्युस असो किंवा गाजराला हलवा, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गाजर खायला आवडते. (Photo : Freepik)
-
सध्या अनेक लोक कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. या लोकांसाठी गाजर फायदेशीर ठरू शकते. या संर्दभात द इंडियन एक्स्प्रेसनी सविस्तर माहिती सांगितली आहे. आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
मधुमेहाचे रुग्णांनी काय खावे आणि काय खाऊ नये, यावर सतत चर्चा केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का मधुमेहाच्या रुग्णांसाठी गाजर अधिक फायदेशीर आहे. त्यांनी आहारात आवर्जून गाजरचा समावेश करावा. (Photo : Freepik)
-
गाजरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे पचनक्रिया कमी करण्यास मदत करतात. गाजर शरीरातील साखर शोषून घेतात ज्यामुळे अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. (Photo : Freepik)
-
अनेक लोकांना हृदयाशी संबंधीत आजार असतात. अशा लोकांनी भरपूर गाजर खावे. गाजरमध्ये खूप जास्त प्रमाणात पोटॅशियम असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. (Photo : Freepik)
-
अनेक लोकं वजन वाढीच्या समस्यांनी त्रासलेले आहेत पण या लोकांनी जर नियमित गाजर खाल्ले तर त्यांचे वजन कमी होऊ शकते. (Photo : Freepik)
-
गाजरामध्ये कॅलरी कमी असतात आणि गाजर पोषक घटकांनी परिपूर्ण असते. यात फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे गाजर खाल्यानंतर भूक लागत नाही आणि वजन कमी करता येऊ शकते. (Photo : Freepik)
-
तुम्ही ताजे गाजर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर सुद्धा गाजर खाऊ शकता. याशिवाय तुम्ही गाजर शिजवून, वाफेवर उकळून किंवा तळून खाऊ शकता. (Photo : Freepik)
-
याशिवाय तुम्ही गाजराचे लहान तुकडे करुन सूप, पुलाव मध्ये सुद्धा टाकू शकता आणि गाजराचा आस्वाद घेऊ शकता. (Photo : Freepik)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”