-
बाजारात काळी आणि हिरवी अशी दोन प्रकारची द्राक्षे मिळतात. तर आज आपण द्राक्ष खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
द्राक्षांमध्ये कॅलरीज कमी तर पाण्याचे प्रमाण जास्त असते ; त्यामुळे वजन कमी करणे आणि हायड्रेट राहणे यासाठी द्राक्ष खाणं हा एक उत्तम पर्याय ठरेल. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट्स डोळ्याखाली सुरकुत्या कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
द्राक्षांमध्ये ए, सी आणि बी ६ ही जीवनसत्व असून, मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअमचे प्रमाण आहे.(फोटो सौजन्य:@Freepik)
-
द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सीचे चांगले स्त्रोत आहेत ; जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहे. घसा जळजळणे, पोटदुखी, आंबट ढेकर, अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे चांगला उपाय ठरू शकतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट्स हृदय व रक्तवाहिन्या यांच्यासाठी फायदेशीर आहे. रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी आदींचा यात समावेश आहे. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
द्राक्षामध्ये फ्लेओनॉइड हा घटक असल्यामुळे त्यांचा उपयोग अँटिऑक्सिडंट्स म्हणून होतो आणि हे तणावाचा सामना करण्यास आणि शरीराचे नुकसान होण्यासपासून संरक्षण करतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
