-
रोजचा कामाचा ताण, प्रवासाची दगदग या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि शरीराची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात अनेक पोषक घटक आवश्यक असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमचा आहार तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यात मोठी भूमिका बजावतो. तुमच्या आहारात झिंक आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक घटकांचा समावेश केल्यास तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चला तर पाहुयात कोणते पाच पदार्थ त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काजू : काजू तांबे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
फॅटी मासे : फॅटी मासे ओमेगा ३ फॅटी ऍसिडने समृद्ध आहे. हे त्वचा निरोगी आणि मुलायम ठेवण्याचे काम करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एवोकॅडो : एवोकॅडो मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असतात. ॲव्होकॅडो केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. कारण – यात असलेले पोषक घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लिंबूवर्गीय फळे : लिंबूवर्गीय फळे जसे की, संत्री, बेरी, लिंबू यांच्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
भोपळी मिरची : लाल आणि पिवळी भोपळी मिरची हा ‘व्हिटॅमिन सी’चा सर्वोच्च स्त्रोत मानला जातो. हे त्वचेचे आरोग्य आणि लवचिकता राखणारे प्रथिने कोलेजन तयार करण्यात आणि त्वचा निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बाजावते. (फोटो सौजन्य: @Freepik)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?