-
भात हा आपल्या देशातल्या लोकांच्या जेवणातला एक अनिवार्य पदार्थ आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतच्या सगळ्या राज्यांमध्ये या ना त्या स्वरूपात भात खाल्ला जातो. पण तुम्हाला माहीत नसेल की, पांढऱ्या तांदळाऐवजी काळे, ब्राउन आणि लाल तांदूळही असतात ज्यांचे अनेक फायदे आहेत. (Photo: Freepik)
-
विशेषतः दक्षिण भारतातील वंशपरंपरागत तांदळाच्या जाती या पौष्टिक आणि उपचारात्मक गुणधर्मांचा खजिना आहेत. त्यामुळे भात खाऊनही दक्षिण भारतातील लोकांचं वजन वाढत नाही. (Photo: Freepik)
-
पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत रेड राइस तेवढं कॉमन नाहीये. हा राइस महाग असतो. तसेच दुकानांमध्ये फार कमी उपलब्ध असतो. पांढरे तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी पूर्णपणे खराब ठरू शकत नाही, जर तुम्ही हे कमी प्रमाणात खाल्ले तरच. पण रेड राइस तुम्हाला सगळ्या स्थितीत फायदे देतो. पौष्टिक जेवण बनवण्यासाठी तुम्ही यात इतर पौष्टिक गोष्टींचं मिश्रण करू शकता. रेड राइसमध्ये अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जसे की सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि बिटा कॅरोटीन. (Photo: Freepik)
-
कैवरा सांब : ही एक भाताची जात आहे, जी अगदी कमी मातीतही वाढू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हा तांदूळ रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करतो, म्हणूनच मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी याचा फायदा होतो. (Photo: Freepik)
-
कुरुवी कर : केरळमधील दुष्काळी भागात या तांदळाचं उत्पादन केलं जातं. यामध्ये सूक्ष्म पोषक तत्वे जास्त असतात आणि सामान्यतः आदिवासी समुदायात हा तांदूळ खाल्ला जातो. (Photo: Freepik)
-
पूंगार : हा एक गोड-सुगंधी तांदूळ आहे, जो विशेषत: तांदळाचे तुकडे बनवण्यासाठी आणि आंबवण्यासाठी पिकवला जातो. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये हे स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान दिले जाते. (Photo: Freepik)
-
कट्टू यनाम : उच्च फायबर असलेला लाल तांदूळ, शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. या तांदळाची चवही रुचकर आहे आणि तांदूळ ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. हा तांदूळ पचायलाही हलका आहे.(Photo: Freepik)
-
कोलियाल : हा केरळमधील तपकिरी रंगाचा तांदूळ आहे, जो पुट्टू बनवण्यासाठी वापरला जातो. पुट्टू हा केरळमधील एक नाश्त्यातील पदार्थ आहे. (Photo: Freepik)
-
काळी कावुनी : तामिळनाडूतील हा आणखी एक भात आहे, ज्यामध्ये उच्च अँथोसायनिन घटक असल्यामुळे त्याचा रंग काळा-जांभळा असतो. हा तांदूळ शरीराला थंड ठेवतो, तसेच हृदयाच्या आरोग्यालाही हा फायदेशीर आहे. (Photo: Freepik)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल