-
बारा महिने उपल्बध असणारा व अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त मुळा हा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
रंगाने पांढरा शुभ्र पण चवीला तिखट आणि थोडासा कडवट हा मुळा बऱ्याच लोकांना खायला आवडत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, हृदयाशी संबधीत आजारामध्ये किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर आज आपण मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
रोगप्रतिकारक शक्ती : मुळा ‘व्हिटॅमिन सी’ने समृद्ध आहे. त्यामुळे मुळा खाल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हायड्रेट राहणे : मुळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ; जे एकूणच तुमच्या शरीराला हायड्रेट राहण्यास मदत करू शकते. कारण – त्वचेचे आरोग्य आणि पचन यांसह विविध शारीरिक कार्यांसाठी हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पोषक तत्वांनी समृद्ध: मुळ्यामधे कॅलरीज कमी आणि व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट आणि फायबर असतात ; जे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मुळामधील व्हिटॅमिन सी त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मुळामधील व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
वजन कमी करण्यास मदत होते : मुळामध्ये कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे वजन नियंत्रित करू पाहणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”