-
लहान मुलांसाठी दूध खूप महत्वाचे आहे कारण त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने यांसारखे अनेक पोषक घटक असतात. हे मुलांचे शरीर मजबूत होण्यास आणि त्यांची योग्य वाढ होण्यास मदत करतात. (Photo: Freepik)
-
परंतु प्रत्येक बाळाच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्यामुळे बाळाला वयानुसार कोणत्या प्रकारचे दूध दिले पाहिजे हे जाणून घेऊयात. (Photo: Freepik)
-
आपल्या बाळासाठी कोणते दूध सर्वोत्तम आहे हे पालकांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया कोणते दूध कोणत्या वयात मुलांसाठी चांगले आहे.(Photo: Freepik)
-
आईचे दूध: जन्मल्यापासून वयाच्या ६ महिन्यापर्यंत बाळासाठी आईचे दूध सर्वोत्कृष्ट आहे. कारण आईच्याच दूधात सर्व आवश्यक पोषक घटक आणि योग्य पोषण यांचा नैसर्गिक स्रोत आहे.(Photo: Freepik)
-
६ महिने ते १ वर्ष या वयातही, आईचे दूध हा बाळासाठी मुख्य आहार असतो.(Photo: Freepik)
-
१ वर्षांनंतर बाळांना बाहेरचे दूध दिले जाऊ शकते. यामध्ये असलेले पोषक घटक त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे. (Photo: Freepik)
-
जर मुलांना दुधाची ऍलर्जी असेल, तर बदामाचे दूध, सोया मिल्क किंवा ओट मिल्क यासारख्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. नेहमी लक्षात ठेवा की मुलांच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.(Photo: Freepik)
-
गाई आणि म्हशीचे दोन्ही दूध मुलांसाठी भरपूर प्रमाणात पोषक असते, परंतु दोन्हीच्या पौष्टिक मूल्यांमध्ये काही फरक आहे. (Photo: Freepik)
-
गाईच्या दुधात प्रथिने आणि व्हिटॅमिन बी-12 जास्त असते आणि ते पचायला सोपे असते, जे लहान मुलांसाठी चांगले असू शकते. तेच म्हशीच्या दुधात कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॅटचे प्रमाण जास्त असते, जे वेगाने वाढणाऱ्या मुलांसाठी फायदेशीर ठरू शकते.(Photo: Freepik)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL