-
आजकालच्या धावपळीच्या जगात बहुतेक लोक खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. सकाळी काहीही खाऊन ऑफिस किंवा शाळेत पोहोचायचं टार्गेट असतं. अशा परिस्थितीत, बहुतेक घरांमध्ये नाश्ता करण्यासाठी ब्रेडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. (Photo: Freepik)
-
पण तुम्हाला माहित आहे का, की रिकाम्या पोटी ब्रेड खाणे किती हानिकारक ठरू शकते. विशेषत: दूध किंवा चहासोबत पांढरं ब्रेड खाल्ल्यास गंभीर नुकसान होऊ शकते. (Photo: Freepik)
-
रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला आधीच मधुमेह असेल तर रिकाम्या पोटी ब्रेड खाऊ नका. (Photo: Freepik)
-
विशेषत: पांढऱ्या ब्रेडमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. या ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्सही भरपूर असतात. (Photo: Freepik)
-
ग्रेन्स फूड फाउंडेशनच्या अहवालानुसार, ब्रेडमध्ये फोलेट, फायबर, आयर्न, व्हिटॅमिन बी असते. पण रिकाम्या पोटी ब्रेड खूप हानिकारक ठरू शकते. (Photo: Freepik)
-
जर तुम्ही रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ले तर तुमचे वजन वाढू शकते. याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात कार्ब्स असतात, त्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढू शकतात. (Photo: Freepik)
-
शरीरातील कॅलरीज वाढण्यासोबतच वजनही वाढू शकते. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर चुकूनही ब्रेड खाऊ नका. (Photo: Freepik)
-
रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने आतड्यांसंबंधी आणि बद्धकोष्ठता संबंधित समस्या उद्भवू शकतात कारण ब्रेडमध्ये भरपूर पीठ असते. (Photo: Freepik)
-
यामुळे आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात. हे खाल्ल्याने पोट साफ होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता टाळायची असेल तर ब्रेड जास्त प्रमाणात खाऊ नये. (Photo: Freepik)

३८ वर्षांपासून एकट्या राहतात उषा नाडकर्णी, मुलगा मानत नाही आई; म्हणाल्या, “मी झोपेत मेले तर…”