-
रंगपंचमी खेळताना चांगले फोटो क्लिक करण्यासाठी म्हणून अनेकजण आपल्याबरोबर मोबाईल ठेवतात. पण काहीवेळा रंगपंचमी खेळताना अचानक मोबाईल पाण्यात पडतो किंवा चुकून त्यात पाणी जाते. (photo – unsplash)
-
अशावेळी काय करावे सुचत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने काही वेळात तुमचा मोबाईल पुन्हा पहिल्यासारखा सुरु होऊ शकतो. (photo – freepik)
-
मोबाईल ताबडतोब बंद करा आणि हलक्या हाताने हलवून त्याती पाणी बाहेर काढा, मोबाईल ताबडतोब बंद केल्यास पाणी आतमध्ये जाण्यापासून रोखले जाते. (photo – unsplash)
-
मोबाईल चालू असताना त्यात पाणी शिरले तर मदरबोर्ड आणि इंटर्नल पार्ट खराब होण्याची शक्यता असते. (photo – unsplash)
-
याशिवाय मोबाईल पाण्यात पडल्यानंतर लगेच चार्ज करण्याचा प्रयत्न करु नका. अशावेळी शॉक लागण्याचा धोका असतो. (photo – unsplash)
-
मोबाईलमध्ये पाणी गेल्या, त्यातील सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढा. सिम कार्ड आणि मेमरी कार्ड पूर्णपणे कोरडे करा, मोबाईलवरील कव्हर देखील काढून टाका. (photo – unsplash)
-
हेअर ड्रायर वापरून तुम्ही मोबाईल सुकवू शकता. पण हेअर ड्रायर कमी सेटिंगवर ठेवा आणि फोनपासून कमीतकमी १० इंच दूर ठेवून ड्राय करा.(photo – unsplash)
-
शेवटी सुती कापडावर मोबाईल टॅप करा आणि त्यातील पाणी काढून टाका. (photo – unsplash)
-
तांदूळ पाणी शोषण्यास खूप चांगले आहे. प्लास्टिकच्या पिशवीत तांदूळ भरा आणि त्यात मोबाईल ठेवा. (photo – unsplash)
-
पिशवी बंद करा आणि २४ तास तशीच ठेवा. तांदूळ मोबाईलमध्ये गेलेले पाणी शोषून घेतात.(photo – unsplash)
-
तुम्ही मोबाईलमधील पाणी बाहेर काढण्यासाठी सिकिला जेल पॅकेट्सचाही वापर करु शकता. हे ओलावा शोषण्याचे काम करतात.(photo – unsplash)
-
अशावेळी मोबाईल २४ तास त्यात ठेवून पुन्हा चालू करा. ज्यानंतर मोबाईल पुन्हा पहिल्यासारखा सुरु होईल. (photo – unsplash)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..