-
ओठांवरील मिशी पुरुषांची शान असते. तर महिलांसाठी ओठांवरील केस श्राप असतो. अशा फार कमी महिला असतील ज्यांना ओठांवर केस नसतील पण ज्यांना ओठांवर दाट लव असते त्यांना ती नकोशी होते. (Photo: Freepik)
-
नको असलेले केस काढण्यासाठी थ्रेडिंग सगळ्यांनाच आवडत नाही, कारण त्याचा खूप त्रास होतो. (Photo: Freepik)
-
काळजी करु नका, आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ही समस्या एका झटक्यात दूर होईल.तुम्हाला त्रासही होणार नाही आणि पार्लरमध्येही जावे लागणार नाही. काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवेल.(Photo: Freepik)
-
मध, साखर आणि लिंबाचा रस हे सगळे १ चमचा घ्या. चमच्याने हलवून हे मिश्रण एकजीव करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आहेत तिथे लावा. १५ ते २० मिनीटांनंतर हलक्या हाताने मसाज करुन हा पॅक काढा.(Photo: Freepik)
-
मध चिकट असल्याने या पॅकसोबत केस निघून येण्यास मदत होईल. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग नक्की करु शकता.(Photo: Freepik)
-
चमचाभर मेथीच्या दाणे पाण्यात भिजत घाला. त्यानंतर त्याची मिक्सरवर पेस्ट तयार करुन ही पेस्ट चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहऱा स्वच्छ धुवून टाका. (Photo: Freepik)
-
त्यामुळे केस निघून जाण्यास मदत होऊ शकते. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय तुम्ही केल्यास चेहऱ्यावरचे केस निघून जाण्यास मदत होईल.(Photo: Freepik)
-
मक्याच्या पीठात साखर आणि अंडे एकत्र करा. त्याची पेस्ट चेहरा आणि हातांवर लावा. थोडा वेळ ठेऊन ही पेस्ट धुवून टाका. त्यामुळे चेहरा आणि हातावरचेही केस निघून जाण्यास मदत होईल.(Photo: Freepik)
-
कसलाही त्रास सहन न करता सहजपणे अपर लिपवरील केसांपासून मिळवा मुक्ती..(Photo: Freepik)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS