-
उन्हाळ्यात अनेकदा अधिक उष्णतेचा परिणाम आरोग्यावर होतो. या उन्हाळी आजारांचा परिणाम लहान मुलांवर लगेच होतो. उन्हाळ्यात उष्ण तापमानामुळे किंवा पावसामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला, विषाणूजन्य आजार होऊ शकतात. शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे अशा अनेक समस्या उद्भवतात.
-
जाणून घ्या उन्हाळ्यात लहान मुलांना अशा अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी काही पौष्टिक पदार्थ जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात.
-
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागल्यावर अनेक समस्या उद्भवतात यासाठी तुम्ही लहान मुलांना रताळे खायला द्या. रताळे खाल्ल्याने बद्धकोष्ठता सारख्या समस्या समस्या कमी होतात.
-
जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते तेव्हा शरीरात अनेक बदल होतात. म्हणून, रोगप्रतिकार शक्ति मजबूत करणे महत्वाचे आहे. यासाठी लहान मुलांना दररोज तुम्ही बदाम, काजू, द्राक्षे आणि इतर अनेक ड्रायफ्रुट्स मुलांना खायला देऊ शकता.
-
उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेली फळे खाल्याने विषाणूजन्य संसर्ग आणि इतर रोगांपासून शरीराचे संरक्षण होते. उन्हाळ्यात तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त रस देखील पिऊ शकता.
-
उन्हाळ्यात तुम्ही लहान मुलांना जास्त पाणी प्यायला दिले पाहिजे यामुळे शरीरातील डिहायड्रेशनसारख्या समस्या कमी होतात.
-
उन्हाळ्याच्या ऋतूत लहान मुलांना चॉकलेट, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स अशा जंक फूडचे सेवन कमी केले पाहिजे.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (Photos: Unsplash)
बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल