-
तुमच्यातील अनेकांना मशरूम खायला नक्कीच आवडत असेल. मशरूमचा सूप, सँडविच, पिझ्झा आदी अनेक पदार्थांमध्ये आवर्जून समावेश करण्यात येतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मशरूममध्ये असणारे पोषक तत्व हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
पोषणतज्ज्ञ Lyndi कोहेन यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करीत, शरीरातील व्हिटॅमिन डीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘मशरूम’बद्दल एक जबरदस्त हॅक सांगितला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
द इंडियन एक्स्प्रेसने DHEE हॉस्पिटल्सचे पोषणतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ शुभा रमेश एल यांच्याशी मशरूम बद्दलच्या या हॅक बद्दल संवाद साधला व याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मशरूम सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा एर्गोस्टेरॉल या संयुगाचे व्हिटॅमिन D2 मध्ये रूपांतर होते. तेव्हा व्हिटॅमिन डीचे सिंथेसिस (संश्लेषण) होते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
संश्लेषण या शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो. निसर्गातील सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांची जोडणी यात केली जाते. ही संश्लेषणाची क्रिया प्रकाशाच्या उपस्थितीमध्ये होते, म्हणून या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण असे म्हणतात. निसर्गात घडणारी ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
जेव्हा एखादी व्यक्ती सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना त्यांची त्वचा व्हिटॅमिन डी 3 चे संश्लेषण करते, ही पद्धत अगदी त्यासारखीच आहे. व्यक्तींची त्वचा प्रामुख्याने व्हिटॅमिन डी 3 संश्लेषण करते, तर मशरूम व्हिटॅमिन डी 2 तयार करतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मशरूममधील व्हिटॅमिन डी संश्लेषणाची कार्यक्षमता, मशरूमचा प्रकार, सूर्यप्रकाशाचा कालावधी, तीव्रता, भौगोलिक स्थान आणि विशिष्ट वेळ यासह अनेक घटकांवर आधारित असतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मशरूमला माध्यान्हीच्या सूर्यप्रकाशात सुमारे एक ते दोन तास ठेवल्याने त्यांच्यातील व्हिटॅमिन डी लक्षणीयरीत्या वाढू शकते.(फोटो सौजन्य: @Freepik )

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?