-
तुम्ही गरोदर असल्याचं पहिलं लक्षण म्हणजे तुमची मासिक पाळी उशिरा येणे. तुम्हाला एरवी नियमित पाळी येत असेल आणि एखाद्या महिन्यात एक दोन दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला असेल तर प्रेग्नन्सी टेस्ट घेऊ शकता. तुम्हाला थोडासा रक्तस्त्राव किंवा क्रॅम्पिंग देखील होऊ शकते
-
डॉ, मिनी साळुंखे यांनी इंडियन एक्सस्प्रेसच्या लेखात दिलेल्या माहितीनुसार, तर गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत स्तनांची संवेदनशीलता वाढण्याची शक्यता असते काही वेळ सूज सुद्धा येऊ शकते
-
साळुंखे यांनी पुढे असेही सांगितले की थकवा, विशिष्ट पदार्थ आणि अन्नाचा वास न येणे किंवा वासाने मळमळणे, पोट खराब होणे आणि उलट्या होणे, योनीतून स्त्राव, मूड बदलणे आणि ताप अशी लक्षणे सुद्धा गर्भारपणाचे संकेत असू शकतात.
-
गर्भधारणेनंतर पहिल्या तीन महिन्यात गर्भपात होण्याचा धोका इतर कोणत्याही तिमाहीपेक्षा जास्त असतो. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीच्या शेवटपर्यंत, तुम्ही अनुभवत असलेली अनेक लक्षणे निघून जाणे सुरू होईल
-
या टप्प्यावर, तुम्हाला तुमच्या वाढत्या गर्भाशयाशी संबंधित इतर समस्या येऊ शकतात. स्पॉटिंग म्हणजे कमी प्रमाणात पाळीसारखेच रक्ताचे डाग पडणे हे सुद्धा एक सामान्य लक्षण आहे परंतु जर रक्तस्त्राव जास्त होत असेल किंवा त्यानंतर वेदना किंवा पेटके येत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-
थकवा, सकाळच्या वेळी मळमळणे आणि वारंवार लघवी होणे ही सर्व तुमच्या शरीरात गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल बदलांची लक्षणे आहेत. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे अत्यंत तीव्रतेने जाणवत असल्यास, लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेट द्या.
-
गरोदर असण्याचे आणखी एक लक्षण म्हणजे सतत धाप लागणे, श्वास घेण्यात अडथळा येणे. याचे कारण म्हणजे गर्भाला ऑक्सिजनची आवश्यकता असते जसजशी गर्भाची वाढ होते तसा तुमच्या फुफ्फुसांवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे सतत धाप लागत असेल आणि अन्य कारणे नसतील तर तुम्ही प्रेग्नन्ट असण्याची शक्यता असते.
-
जर तुम्हाला अचानक डोकेदुखीचा त्रास होत असेल, पाठदुखीचा त्रास होत असेल तर हे सुद्धा तुमच्या शरीरातील हार्मोन्सच्या बदलाचे परिणाम असू शकतात. गर्भारपणात हळूहळू हे त्रास वाढत जातात. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून