-
अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की नियमितपणे केलेले मध्यम-तीव्रतेचे व्यायाम रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. ते आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी करून पचनक्रिया सुधारून कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्यास मदत करतात.
-
जलद चालणे: अभ्यासातून असे दिसून आले आहे की आठवड्यातून ५ दिवस ३० मिनिटे जलदगतीने चालल्याने रक्ताभिसरण सुधारू शकते आणि कर्करोगाच्या वाढीचा धोका कमी होऊ शकतो.
-
रक्तप्रवाह सुधारतो: रक्ताभिसरण चांगले होते म्हणजे तुमच्या पेशींपर्यंत जास्त ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचतात, ज्यामुळे तुमचे शरीर आतील कँसरच्या वाढीसाठी अनुकूल राहत नाही.
-
हार्मोन्स संतुलित करते: व्यायामामुळे इन्सुलिन आणि इस्ट्रोजेनची पातळी नियंत्रित होते, ज्यामुळे स्तन आणि एंडोमेट्रियल कर्करोगासारख्या हार्मोनशी संबंधित कर्करोगाचा धोका कमी होतो.
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: वेगाने चालल्याने नैसर्गिक किलर (एनके) पेशी वाढतात, ज्या कॅन्सरच्या पेशी ओळखण्यात आणि नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
-
क्रॉनिक इन्फ्लेमेशन कमी करते: दीर्घकालीन जळजळ (क्रॉनिक इन्फ्लेमेशन) कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस चालना देते. नियमित चालण्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते.
-
मानसिक आरोग्याला मदत करते: चालण्यामुले तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते, ज्यामुळे कर्करोगाच्या प्रतिबंधात मदत होते.
हेही पाहा- सावधान! बाहेरून आणलेला पनीर खाण्याचे ‘हे’ धोके माहितीयेत का?

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”