-
झोपेबाबत तुमच्या तक्रारी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रात्री वेळेवर झोप लागत नाही, खूप वेळ जागे राहता, सकाळी झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही अशा तक्रारी करत असाल तर आम्ही तुम्हाला झोपेची गुणवत्ता कशी सुधारता येईल याबाबत टिप्स देणार आहोत. तुमच्या झोपेची गुणवत्ता नैसर्गिकपणे सुधारण्यासाठी खाली दिलेले साधे, पण प्रभावी उपाय वापरून पाहा. (Photo Source: Unsplash)
-
सकाळी सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या : सकाळी काही वेळ कोवळ्या सूर्यप्रकाशात बसा. किंवा सूर्यप्रकाशात योगाभ्यास करा, थोडा व्यायाम अथवा स्ट्रेचिंग करा. यामुळे रात्री झोप लागणं सोपं होतं. (Photo Source: Unsplash)
-
खोली थंड असावी, अंधार असावा : १८ अंश सेल्सिअस ते २० अंश सेल्सिअस हे झोपण्यासाठी योग्य तापमान मानलं जातं. परंतु, काहींना या तापमाना थंडी वाजू शकतो. त्यामुळे तुमच्या शरीराला सहन होईल इतकं थंड वातावरण तुमच्या खोलीत असलं पाहिजे याची काळजी घ्या (किमान २२ ते २३ अंशांपर्यंत). खोलीत अंधार असावा, दिवे बंद ठेवा, खिडक्यांवर गडद रंगाचे पडदे असायला हवेत. या सर्व गोष्टी गाढ झोपेसाठी मदत करतात. (Photo Source : Unsplash)
-
विश्रांती तंत्रांचा सराव करा : झोपेपूर्वी दीर्घ श्वास घेतल्याने, ध्यान किंवा सौम्य ताण कमी करणारे व्यायाम तुमच्या स्नायूंना आराम देऊन झोप लवकर लागण्यास मदत करू शकतात.(Photo Source: Unsplash)
-
कॅफीन आणि जड जेवण टाळा : झोपण्याच्या ६ ते ८ तास आधी कॅफीन (कॉफी आणि इतर पेय) घेणं बंद करा. सायंकाळी हलका नाश्ता, रात्री हलकं जेवण करा, जे पचनासाठी सोपं असेल व गाढ झोपेच्या आड येणार नाही. (Photo Source: Unsplash)
-
स्क्रीन टाइम मर्यादित करा : फोन आणि लॅपटॉपच्या निळ्या प्रकाशामुळे मेलाटोनिन दडपला जातो. झोपण्यापूर्वी कमीत कमी १ तास आधी वाचन, लेखन किंवा शांत संगीत ऐकण्यास प्राधान्य द्या. झोपण्याअगोदर मोबाईल व लॅपटॉप वापरणं टाळा.(Photo Source: Unsplash)
-
झोपेची वेळ निश्चित करा, त्यात बदल करू नका : दररोज एकाच वेळी झोपा आणि सकाळी ठरलेल्या वेळी उठा, अगदी आठवड्याच्या शेवटीसुद्धा म्हणजेच सुट्टीच्या दिवशीसुद्धा. रोज एकाच वेळी झोपलात व एकाच वेळी उठलात तर शरीराला त्या वेळेची सवय होईल. काही दिवसांनी तुम्ही त्या ठरलेल्या वेळेत आपोआप झोपी जाल.(Photo Source: Unsplash)

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण