-
प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांच्या पलीकडे, भारतात जैवविविधता, आदिवासी संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेली जंगलं, राखीव वनं आहेत जिथे पर्यटकांची फार गर्दी नसते. आज आम्ही तुम्हाला आशा काही आश्चर्यकारक जंगलांची माहिती देणार आहोत, जिथे तुम्ही एकदा तरी भेट द्यायलाच हवी. (PC : Wikimedia commons)
-
भितरकणिका खारफुटीचे जंगल, ओडिशा : भारताचे ‘मिनी सुंदरबन’ म्हणून ओळखले जाणारे, भितरकणिका खाऱ्या पाण्यातील मगरी, किंग कोब्रा आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे दाट खारफुटीच्या कालव्यांमधून बोटीने प्रवास करणे हा एक अविश्वसनीय अनुभव आहे. (PC : Wikimedia commons)
-
बोरी वन्यजीव अभयारण्य, मध्य प्रदेश : भारतातील सर्वात जुन्या वनसंरक्षणापैकी एक, बोरी हे सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. सागवानाची जंगलं, अस्वलं आणि बिबट्यांसह अनेक प्राणी तुम्ही येथे पाहू शकता. निसर्ग प्रेमींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. (PC : Wikimedia commons)
-
दांडेली वन्यजीव अभयारण्य, कर्नाटक: पश्चिम घाटातील एक रत्न असलेल्या दांडेली अभयारण्यात तुम्हाल ब्लॅक पँथर पाहायला मिळेल. यासह हॉर्नबिल आणि हिरव्यागार सागवानांच्या जंगलांनी हे अभयारण्य भरलं आहे. पर्यटक येथील काली नदीवर रिव्हर राफ्टिंग करू शकतात, तर ट्रेकर्स या जंगलातील पायवाटांवरून ट्रेक करू शकतात. (PC : Wikimedia commons)
-
कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान, कर्नाटक: घोड्याच्या तोंडासारखा आकार असलेल्या पर्वतावरून हे कन्नड नाव पडलेलं आहे. कुद्रेमुख येथे हिरव्यागार टेकड्या, जंगलं आणि धबधबे आहेत. साहस आणि एकांत दोन्ही हवे असलेल्या ट्रेकर्ससाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. (PC : Wikimedia commons)
-
नामदाफा राष्ट्रीय उद्यान, अरुणाचल प्रदेश : भारत-म्यानमार सीमेजवळ स्थित, नामदाफा हे आशियातील सर्वात मोठ्या वनसंरक्षणापैकी एक आहे. येथे वाघ, बिबट्या, हिम बिबट्या आढळतात. (PC : Wikimedia commons)
-
सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प, ओडिशा : हिरव्यागार टेकड्या आणि धबधब्यांनी नटलेलं सिमलीपाल जंगल वाघ, हत्ती आणि महाकाय मगरींचं घर आहे. हे युनेस्कोचे बायोस्फीअर अभयारण्य आहे, जे समृद्ध जैवविविधता आणि आदिवासी वारशाची झलक देतं. (PC : Wikimedia commons)
राहुल गांधींच्या खळबळजनक दाव्यांवर निवडणूक आयोगाचं उत्तर; म्हणाले, “तुमचे एजंट्स…”