-
भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. त्यामध्ये आवश्यक खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि गुड फॅट्सचा समावेश असतो. याचा हृदयाच्या आरोग्यापासून ते झोपेपर्यंत सर्व गोष्टींना फायदा होता.
-
भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियम आणि गुड फॅट रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
-
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, जस्त, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सने असतात, जे एकूण आरोग्यासाठी आणि मजबूत हाडांसाठी आवश्यक असतात.
-
यात असलेल्या झिंक आणि व्हिटॅमिन ई मुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते तुमच्या शरीराचे संक्रमणांपासून संरक्षण करतात.
-
संशोधनातून असे दिसून आले आहे की, भोपळ्याच्या बियांचे तेल प्रोस्टेट वाढ रोखू शकते आणि मूत्राशयाचे कार्य सुधारू शकते.
-
भोपळ्याच्या बिया ट्रिप्टोफॅनचे नैसर्गिक स्रोत असतात, जे तुमच्या शरीराला चांगल्या झोपेसाठी सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करण्यास मदत करते.
-
भोपळ्याच्या बियांतील फायबर आणि मॅग्नेशियमचे प्रमाण रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते, चयापचय प्रक्रियेसाठी मदत करते.
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या