-
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सूर्यफूल बीज केवळ स्नॅक नाही, तर आरोग्याचा खजिना आहे. या बीजातील नैसर्गिक घटक तणावामुळे नुकसान झालेल्या आतड्यांच्या अस्तराची दुरुस्ती करण्यास मदत करतात, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दररोजचा मानसिक ताण आणि आहारामुळे पचनसंस्था कमजोर होते. या तणावाचा थेट परिणाम आपल्या ‘गट लायनिंग’वर म्हणजेच आतड्यांच्या आतील थरावर होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सूर्यफूल बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई, झिंक, मॅग्नेशियम व ओमेगा-६ फॅटी अॅसिड हे घटक आतड्यांमधील सूज कमी करून, त्याचे संरक्षण करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
डॉक्टरांच्या मते, या बिया शरीरातील जळजळ कमी करते आणि पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांच्या संतुलनाला साह्य करते. त्यामुळे पोटफुगी, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर राहतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सूर्यफुलाच्या बिया हे नैसर्गिक ‘अँटिऑक्सिडंट’ मानले जाते. त्यामुळे ते शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यात आणि पेशींना नवजीवन देण्यात मदत करते.(फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
हे बीज सलाड, दही, स्मूदी किंवा दलियामध्ये मिसळून खाल्ले जाऊ शकते. डॉक्टरांच्या मते, दिवसातून एक ते दोन चमचे सूर्यफूल बीज पुरेसे ठरते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
अति सेवन टाळावे. कारण- जास्त प्रमाणात घेतल्यास पचनावर उलटा परिणाम होऊ शकतो. प्रमाणात आणि नियमितपणे घेतल्यासच याचा लाभ मिळतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
तणावग्रस्त जीवनशैलीत लहानसा बदल करून सूर्यफुलांच्या बिया आपल्या आहारात समाविष्ट केल्यास, पचनसंस्था मजबूत राहते आणि संपूर्ण आरोग्य टिकून राहते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
जोहरान ममदांनी यांच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “..म्हणून रिपब्लिकन उमेदवारांचा पराभव”