-
डाळिंब हे पोषणाने समृद्ध आणि स्वादिष्ट फळ आहे. त्यात लोह, फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम व अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. मात्र, हे फळ प्रत्येकासाठी फायदेशीर ठरेलच, असे नाही. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
अॅलर्जी असलेल्यांनी घ्यावी काळजी
त्वचेवरील अॅलर्जी, खाज किंवा रॅशेस असलेल्या व्यक्तींनी डाळिंब टाळावे. त्यातील काही घटक त्वचेवर लालसरपणा आणि खाज वाढवू शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. (फोटो सौजन्य : पेक्सल्स) -
कमी रक्तदाब असलेल्यांनी दूर राहावे
डाळिंबाचा थंड गुणधर्म असल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. कमी रक्तदाब असणाऱ्यांसाठी हे फळ घातक ठरू शकते. त्यामुळे सेवन मर्यादित ठेवा किंवा टाळा. (फोटो सौजन्य : पेक्सल्स) -
पचनाच्या त्रासात डाळिंब टाळा
ज्यांना गॅस, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी डाळिंब खाणे टाळावे. त्यामुळे पचन मंदावते आणि पोटदुखी किंवा फुगणे वाढू शकते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स) -
सर्दी-खोकल्यात डाळिंब नको
थंडी, खोकला किंवा घशात खवखव असल्यास डाळिंब खाल्ल्याने त्रास वाढू शकतो. त्याची थंड प्रकृती कफ वाढवते आणि शरीराला अधिक जड बनवते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स) -
मानसिक आजार असलेल्यांनी
मानसिक आजारांसाठी औषधे घेणाऱ्यांनी डाळिंबापासून सावध राहावे. काही संशोधनांनुसार डाळिंबातील घटकांची औषधांशी रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स) -
योग्य वेळ कोणती?
सकाळच्या वेळी, विशेषतः रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात डाळिंब खाणे सर्वांत फायदेशीर असते. त्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स) -
काही गोष्टी लक्षात ठेवा
डाळिंब कधीही दूध किंवा दह्यासोबत खाऊ नका. त्यामुळे पचन बिघडू शकते. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत खाल्लेले डाळिंब आरोग्यासाठी अमृतासारखे ठरते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
“ब्राझीलच्या महिलेने हरियाणात २२ वेळा मतदान केलं, ही कोण आहे?”; राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत पुरावे दाखवत सवाल