-
तुम्हाला एका आधारकार्डवर किती सिमकार्ड खरेदी करता येतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? पण हा खरोखर महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचदा आपण एकच सिमकार्ड विविध मोबाईल सिम कंपन्यांसोबत पोर्ट करतो. तर अनेकदा कुटुंबातील एका सदस्याच्या आधार कार्डद्वारे कुटुंबातील इतर व्यक्ती सिमकार्ड घेतात.
-
पण अशावेळी एका आधारकार्डवर किती सिम खरेदी करता येतात, त्याची मर्यादा किती याची माहिती असणे आवश्यक आहे.
-
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI)यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आधार कार्डावर जास्तीत जास्त 18 सिमकार्ड काढता येतात.
-
त्यामुळे तुमच्या आधारकार्डवर कोणी किती सिमकार्ड खरेदी केले आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. अनेकदा आधार क्रमांकाचा गैरवापर करुन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे सिमकार्ड घेतल्याच्या तक्रारीही दाखल केल्या जातात.
-
हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या आधारकार्डवर किती सिमकार्ड आहे याची माहिती शोधणे हा आहे. यापूर्वी TRAI च्या एका आधारकार्ड क्रमांकावरुन 9 सिमकार्ड काढण्याचा नियम होता. त्यानंतर ही मर्यादा वाढवून 18 करण्यात आली.
-
आता एका आधार क्रमांकावरून 18 सिमकार्ड खरेदी करता येतात. TRAI कडून हा नवा नियम तयार करण्यात आला आहे.
-
अनेकदा व्यवसायाच्या उद्देशाने काही जणांना एकाचवेळी अनेक सिमकार्ड घेणे आवश्यक असते.
-
त्यांच्या गरजा लक्षात घेऊन या सिमकार्डची संख्या 9 वरुन 18 करण्यात आली आहे.
-
त्यामुळे एका आधारकार्डवरुन किती सिमकार्ड काढता येऊ शकतात, याची माहिती तुम्हालाही सहज मिळवता येते. पण त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा आधारकार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
-
त्यामुळे जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक केला नसेल तर तुम्हाला ते काम सर्वात आधी करावे लागेल.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान