-
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात गुंडे मांडवली करतात असे नवाब मलिक म्हणाल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीसांनी त्यावर उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मांडवलीची गरज पडत नाही. आम्ही चर्चा करतो, असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
-
फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
-
त्यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनी प्रत्युत्तर दिले आहे. मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, दिवाळीनंतर मी बाँब फोडणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
यावेळी ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
नीरज गुंडे यासंदर्भात स्वतः उत्तर देतील. पण नवाब मलिकांनी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवं. नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच. मी जेवढे वेळा गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा उद्धव ठाकरे गुंडेंच्या घरी गेले आहे. गुंडे माझ्यापेक्षा जास्त वेळा मातोश्रीवर गेले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
वाझे पाळायची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
-
नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची त्यांची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
-
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात गुंडे मांडवली करतात असे नवाब मलिक म्हणाल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीसांनी त्यावर उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मांडवलीची गरज पडत नाही. आम्ही चर्चा करतो, असे फडणवीस म्हणाले.
-
देवेंद्र फडणवीस विनापुराव्याचे आरोप करत नाही आणि आज पर्यंत केलेले आरोप मला परत घ्यावे लागलेले नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. लवकरच याबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवणार असल्याचे सांगितल्यावर नवाब मलिक यांनी ट्वीट करत केवळ ३ शब्दात प्रत्युत्तर दिले.
-
“है तैयार हम” असे नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवर टॅग करत म्हटलं आहे.

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर