-
स्वातंत्र्योत्तर काळातील प्रत्येक पिढीला सुख, दु:ख आणि सर्व भावनांचा उत्सव स्वरांतून पकडणारी गानप्रतिनिधी म्हणून आपलीशी वाटणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
करोनाचा संसर्ग झाल्याने लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून दुपारी त्यांचे पार्थिक पेडर रोड येथील प्रभुकुंज निवासस्थानी आणण्यात आले. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
चित्रपटसृष्टीतील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी प्रभुकंज येथे लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लताबाईंच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि रुग्णालयात पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
पेडर रोड येथून दुपारी ४ च्या सुमारास लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचली. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार सुप्रिया सुळे, अनिल देसाई, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली तेंडुलकर, अभिनेता शाहरुख खान, आमीर खान, गायक शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी शिवाजी पार्क मैदानात लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्क येथे पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
पंतप्रधान मोदी यांनी शिवाजी पार्कवर जाऊन लताबाईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
लष्कर, नौदल आणि हवाई दलातर्फे लता मंगेशकर यांना शिवाजी पार्क मैदानात मानवंदना देण्यात आली. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दिदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
‘मेरी आवाज ही पहचान हैं’, ‘अखेरचा हा तुला दंडवत’, ‘ए मेरे वतन के लोगो’ अशी गाणी गात रसिकांनी शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
‘लता दीदी अमर रहे’ अशा घोषणांनी शिवाजी पार्क दुमदुमून गेले. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
शिवाजी पार्क मैदानात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही विचारपूस केली. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ