-
काँग्रेसचे माजी आमदार संतोष टर्फे यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (२९ ऑगस्ट) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
-
यावेळी उद्धव ठाकरे यांनी या पक्षप्रवेशावर भाष्य केलं आणि पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तर दिलं.
-
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदूत्व, दसरा मेळावा, बंडखोर एकनाथ शिंदे गट, राहुल गांधी, काँग्रेस आणि गुलाम नबी आझाद यांच्यावरही भाष्य केलं. यातील प्रमुख १५ मुद्दे खालीलप्रमाणे…
-
१. दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडने युती केली. आज संघ परिवारातील लोक शिवसेना परिवारात आले आहेत – उद्धव ठाकरे
-
२. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो आणि आश्चर्यदेखील वाटतं. सर्वसामान्यपणे सत्ताधारी पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागते. मात्र, आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहे – उद्धव ठाकरे
-
३. महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही. याची प्रचिती दाखवत ही मंडळी शिवसेनेत येत आहे – उद्धव ठाकरे
-
४. भाजपाने आम्ही हिंदुत्व सोडल्याची आवई उठवली होती. त्याला छेद देणाऱ्या या पक्षप्रवेशाच्या घटना आहे – उद्धव ठाकरे
-
५. बहुजन, वंचितांसह मुस्लीम बांधवदेखील शिवेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत – उद्धव ठाकरे
-
६. राज्यात एक वेगळं चित्र निर्माण होत आहे आणि हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल – उद्धव ठाकरे
-
७. ज्यांना हिंदूत्वाच्या भ्रामक कल्पनेत आपण फसले गेलो आहोत असं वाटतं त्यांना मातोश्रीचे म्हणजे शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत – उद्धव ठाकरे
-
८. कोणताही संभ्रम नाही. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार आहे – उद्धव ठाकरे
-
९. दसरा मेळाव्याविषयी संभ्रम निर्माण करणाऱ्यांना संभ्रम निर्माण करू द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरू केलेली आहे – उद्धव ठाकरे
-
१०. मुंबई महानगरपालिकेकडून येणाऱ्या परवानगीचा जो तांत्रिक मुद्दा असेल तो त्यांचा ते पाहतील. मात्र, शिवसेनेचा मेळावा दसऱ्याला शिवतीर्थावरच होणार आहे – उद्धव ठाकरे
-
११. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडताना राहुल गांधींवर जे आरोप केले तसंच मी पण भोगतो आहे – उद्धव ठाकरे
-
१२. इकडे आनंदी आनंद आहे आणि आनंदाचा कंटाळा आला म्हणून मी घर सोडतो आहे असं कुणीही कधी बोलत नाही. आमच्याकडेही तेच झालं – उद्धव ठाकरे
-
१३. गद्दारांना नेमकी गद्दारी कशासाठी केली हा प्रश्न पडलाय. काल काय बोललो, आज काय बोलतोय, उद्या काय बोलायचं असे प्रश्न त्यांना पडत आहेत. हे होत असतं, राजकारणात हे नवीन नाही – उद्धव ठाकरे
-
१४. शिवसैनिक आणि शिवसेना आहे तिथं ठाम आहे. शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही की, कुणीही उचलावी आणि खिशात टाकावी – उद्धव ठाकरे
-
१५. शिवसेनेला ५६ वर्षे झालीत. असे ५६ लोकं आम्ही पाहिले आहेत. शिवसेना निष्ठावंतांच्या रक्तावर मोठी होणारी सेना आहे, गद्दारांच्या मेहनतीवर नाही – उद्धव ठाकरे

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख