-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या आरोपापासून राज्यपालपदावरून भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वक्तव्यापर्यंत अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
-
ते रविवारी (८ जानेवारी) कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली याचा हा आढावा…
-
राज ठाकरे आरोप काहीही करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या पक्षाचे नेते कोण होते याची नोंद पाहिली तर पहिलं नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे होतं. ते कुठल्या समाजाचे आहेत मी सांगण्याची गरज नाही – शरद पवार
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या पक्षाचे नेते कोण होते याची नोंद पाहिली तर पहिलं नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे होतं. ते कुठल्या समाजाचे आहेत मी सांगण्याची गरज नाही – शरद पवार
-
नंतरच्या काळात मधुकर पिचड होते. ते आदिवासी समाजाचे होते. अशा अनेक लोकांची नावं सांगता येतील – शरद पवार
-
खरंतर ही नावं सांगण्याचीही गरज नाही, कारण हा विषय कधी आमच्या मनातही येत नाही – शरद पवार
-
आम्ही सर्व शाहू-फुले-आंबेडकर विचाराचे लोक आहोत. त्यामुळे कोणी अशी टीका केली तर त्याची आम्ही दखल घेत नाही – शरद पवार
-
भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदामुळे दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत – शरद पवार
-
महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत – शरद पवार
-
पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले – शरद पवार
-
महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली – शरद पवार
-
हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते – शरद पवार
-
ते सतत चुकीची वक्तव्ये करतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगलं नाही – शरद पवार
-
शेवटी हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही – शरद पवार
-
राम मंदिर बांधून कधी पूर्ण होणार हा देशाच्या गृहमंत्र्याचा विषय आहे की नाही मला माहिती नाही – शरद पवार
-
ही माहिती राम मंदिराच्या पुजाऱ्याने दिली असती, तर ही चांगली गोष्ट झाली असती. मात्र, अमित शाह पुजाऱ्याची जबाबदारीही घेत आहेत. हरकत नाही – शरद पवार
-
लोकांच्या प्रमुख प्रश्नांवर लक्ष जाऊ नये, जनतेचं लक्ष विचलित करावं यासाठी राम मंदिर किंवा त्यासारखे विषय काढले जात आहेत – शरद पवार
-
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या राज्यावर इतके हल्ले झाले. त्या हल्ल्यांना समर्थपणे तोंड देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं – शरद पवार
-
हा इतिहास आहे. त्यामुळे त्यांना स्वराज्यरक्षक म्हणणं यात फारसं काही चुकीचं नाही. त्यावर वाद करण्याचंही काही कारण नाहीये – शरद पवार
-
आम्हीही बिहारप्रमाणेच जातीवर आधारित जनगणनेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत – शरद पवार
-
अशी जनगणना करावी, ही मागणी आम्हा सगळ्यांची गेली अनेक वर्षं आहे. सातत्याने आम्ही ती करतोय – शरद पवार
-
समाजातील लहान घटक असला, तर त्याची नेमकी संख्या किती, स्थिती काय या गोष्टींचं मोजमाप एकदा झालं पाहिजे – शरद पवार
-
त्यांना वर आणण्यासाठी वेगळे कार्यक्रम केले पाहिजेत. त्यासाठी ही जनगणना आवश्यक आहे असा विचार आम्ही लोकांनी मांडला आहे – शरद पवार
-
मला आनंद आहे की नितीश कुमारजी यांनी त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली – शरद पवार
-
सरकार कोसळणार या वक्तव्यामागे संजय राऊतांचं नेमकं काय नियोजन आहे याबद्दल आता मी गेल्यावर त्यांच्याकडून जाणून घेईन – शरद पवार
-
त्यांचं काही नियोजन असेल, तर त्याबद्दल मला फारशी काही माहिती नाही – शरद पवार
-
सर्व छायाचित्र सौजन्य – संग्रहित

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट