-    काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी बंडखोरी करत मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. 
-    यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई केली. 
-    सत्यजीत तांबेंवरही निलंबनाच्या कारवाईची शक्यता आहे. 
-    यानंतर डॉ. सुधीर तांबेंना याबाबत विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 
-    ते सोमवारी (१६ जानेवारी) निफाड येथे प्रचारासाठी आले असताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा… 
-    यात बराच गुंता झाला आहे. पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचा आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले होते. केवळ तांत्रिक कारणामुळे त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही – सुधीर तांबे 
-    सध्या आमच्या पक्षश्रेष्ठींनाही याबाबत बरेच गैरसमज झालेले दिसत आहेत. त्याबद्दल आम्ही सविस्तर निवेदन करू – सुधीर तांबे 
-    जंगले की पाटील याबाबत मी काहीच सांगू शकणार नाही. त्याबाबत मला काहीच कल्पना नाही – सुधीर तांबे 
-    मी प्रचारातच आहे. गिरीश महाजन शुभांगी पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत की नाही याचीही मला काही कल्पना नाही – सुधीर तांबे 
-    मला याचा संदर्भही माहिती नाही. शुभांगी पाटील आणि माझाही तशा अर्थाने काहीच संपर्क नाही – सुधीर तांबे 
-    सत्यजीत तांबेंनी भाजपाचा पाठिंबा मागितला होता याबाबत विचारला असता यावेळी सुधीर तांबे म्हणाले, “सत्यजीत तांबे किंवा आम्ही कोणीही भाजपाचा पाठिंबा मागितलेला नाही” 
-    तसेच आम्ही भाजपाचा पाठिंबा मागणार नाही, असंही सुधीर तांबेंनी नमूद केलं. (सर्व छायाचित्र संग्रहित) 
 
  बापरे! शनी महाराज कर्मांचे हिशोब घेणार! मेषनंतर ‘या’ राशीची साडेसाती सुरु होणार? पुढील अडीच वर्ष दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं येणार? 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  