-
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट झाली.
-
या भेटीवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस आली. त्यामुळे जयंत पाटीलही भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चां रंगल्या आहेत.
-
जयंत पाटील भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांना आज ( सोमवार, १४ ऑगस्ट ) बारामतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, सत्तेचा गैरवापर करून ही पावले टाकली जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे.
-
शरद पवार म्हणाले, “जयंत पाटलांच्या बंधूंना ईडीची नोटीस आल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे.”
-
“सत्तेचा गैरवापर करून ही पावले टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना अशा काही नोटीसा आल्यानंतर ते भाजपाबरोबर जाऊन बसले.”
-
“तसेच, आता जयंत पाटलांबाबत करण्याची भूमिका घेण्यात आल्याचं दिसत आहे. पण, जयंत पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर